डिजीटल मिडिया संपादक, पत्रकार संघटनेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी रविंद्र कांबळे
खजिनदार मा.संतोष साठे उपाध्यक्षपदी सुरज लवटे व कैलास हिप्परकर,सचिवपदी नितीन होवाळ यांची निवड
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला/प्रतिनिधी ःडिजीटल मिडिया संपादक, पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्यच्या सांगेाला तालुका कार्यकारिणीची निवड करण्यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने
यांच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सतिशभाऊ सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण नागणे यांनी सांगोला तालुका कार्यकारिणीच्या निवडी जाहीर केल्या.
यामध्ये नूतन जिल्हा उपाध्यक्षपदी शुभम ऐवळे यांची तर सांगोला तालुका अध्यक्षपदी रविंद्र कांबळे, सचिवपदी नितीन होवाळ, उपाध्यक्षपदी सुरज लवटे, कैलास हिप्परकर, कार्याध्यक्ष निखिल काटे, सहसचिव बबन चव्हाण,
सहकार्याध्यक्ष सुनिल वाघमोडे, कोषाध्यक्ष दादासो इंगोले, सहकोषाध्यक्ष पांडुरंग ऐवळे, खजिनदार संतोष साठे, सहखजिनदार विकास वाघमारे, कार्यकारिणी सदस्य म्हणून नाविद पठाण, अमोल महारनवर,
अमेय मस्के, छोटू दौंडे, किशोर म्हमाणे, पांडुरंग पाटील, पवन बाजारे, शब्बीर मुलाणी, जगन्नाथ साठे, सिध्देश्वर माने, कैलास गोरे, रोहित सुर्यागण आदींची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
पुढील काळामध्ये संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब व राज्य उपाध्यक्ष सतिशभाऊ सावंत, जिल्हाध्यक्ष प्रविण नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना बळकट करून
सांगोला तालुक्यातील पत्रकारांच्या अडी अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी व पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचे काम करणार असल्याचे मत नूतन तालुकाध्यक्ष रविंद्र कांबळे यांनी व्यक्त केले.
यावेळी राज्य उपाध्यक्ष सतिशभाऊ सावंत, नूतन जिल्हा उपाध्यक्ष शुभम ऐवळे, नूतन उपाध्यक्ष सुरज लवटे, जगन्नाथ साठे यांनी मनोगत व्यक्त केले. नूतन कार्यध्यक्ष निखिल काटे यांनी आभार मानले.
0 Comments