हे म्हातार 84 वर्षाचे असो किंवा 90 वर्षाचे झालं तरी सत्ता परीवर्तन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – खा शरद पवार, नाव न घेता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना टोला
विराट शक्ती प्रदर्शन करीत आ.दीपक चव्हाण आणि श्रीमंत संजीवराजे यांनी कार्यकर्त्यांसह हाती घेतली तुतारी
फलटण – हे म्हातार 84 वर्षाचे असो किंवा 90 वर्षाचे झालं तरी सत्ता परीवर्तन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे नाव न घेता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना टोला
लगावतनाच खा शरद पवार यांनी आपल्या भाषणात आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे कौतुक करताना राजे गटाच्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.
येथील अनंत मंगल कार्यालयामध्ये आमदार दीपक चव्हाण ,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती
विश्वजीतराजे नाईक निंबाळकर ,माजी नगरसेवक अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह हजारो राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे
अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील,
खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील ,माजी आमदार प्रभाकर घार्गे, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,
माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर ,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई , अभयसिंह जगताप, उत्तमराव जानकर ,सुनील माने, सौ प्रतिभा शिंदे आदी उपस्थित होते.
फलटणमध्ये सर्वप्रथम साखर कारखानदारी श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी उभारली माळेगाव सहकारी साखर कारखाना तसेच निरा खोऱ्यातील साखर कारखाने उभारणीमध्ये
त्यांचे मोठे योगदान असून कारखान्यांचा पाया त्यांनीच घातल्याचे गौरवोदगार खासदार शरद पवार यांनी काढले.
मराठी भाषिकांचे राज्य येण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले लढा दिला यामध्ये फलटणकारांचे सुद्धा योगदान होते.
यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा नेता असल्यामुळे महाराष्ट्र ताट मानेने उभा राहू शकला.मात्र आज महायुतीच्या सत्तेच्या काळात महिला मुलींवर अत्याचार वाढले
असून हे राज्यकर्ते आई बहिणीचे रक्षण करू शकत नाही.गुन्हेगारी वाढली आहे महाराष्ट्राची शान गेली असून आज पुन्हा महाराष्ट्र उभा करायचा आहे. त्यासाठी महाविकास आघाडीची सत्ता येणे गरजेचे आहे.
आज मी 84 वर्षाचा आहे 90 वर्षाचा झालो तरी महाराष्ट्राला योग्य दिशेला आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा टोला त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव न घेता लगावला.
आज आ .रामराजे येथे दिसत नसले तरी त्यांची चिंता तुम्ही करू नका त्यांची मानसिकता बघा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची निवडणूक मी बघितली त्यावेळी रामराजे असो किंवा संजीवराजे असो
त्यांनी आपल्याला मदतच केली आहे असे स्पष्ट करतानाच कमिन्स कंपनी बारामती मध्ये आली होती मात्र मी या भागाच्या विकासासाठी फलटणला कमिन्स कंपनी उभारण्याचा निर्णय घेतला याला रामराजे नाईक निंबाळकर यांनी
मोठी साथ दिली त्यांचेही कमिन्स उभारणीमध्ये मोठे योगदान असल्याचे कौतुक खासदार शरद पवार यांनी करून कमिन्समुळे या भागातील सात ते आठ हजार जणांना रोजगार मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
फलटणची भूमी ही छत्रपती शिवाजीमहाराज यांची सासरवाडी ,छत्रपती संभाजी महाराज यांचे आजोळ असलेली ऐतिहासिक भूमी असून या भूमीतील नाईक निंबाळकर घराण्याने
पुन्हा पवार साहेबांची साथ देण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. महायुतीने महाराष्ट्राला भ्रष्टाचाराच्या खाईत लोटले असून सत्तेसाठी आमदार विकत घेण्याचे पाप त्यांनी केला आहे
मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र विकला जात नाही हे जनतेने दाखवून द्यावे टायगर अभी खडा आहे असे म्हणत त्यांनी खासदार शरदचंद्र पवार यांची तुलना टायगर म्हणून केली.
लोकसभा निवडणुकीचा महायुतीला कडकी आली होती त्यामुळे त्यांना आता लाडकी बहीण आठवली आहे मात्र आज महागाई कोणामुळे वाढली,खर्च किती वाढला हे बहिणीला कळते आनंदाचा शिधा जो दिला जातो त्याचे टेंडर गुजरातला दिले
असून तुमचा पैसा गुजरातला वळविला जात असल्याचा आरोप खासदार अमोल कोल्हे यांनी केला. सत्तेची दिवाळी खाण्यासाठी महायुतीने तिजोरीची दिवाळी केले असल्याचा आरोपही त्यांनी केला
भाजपमध्ये राम राहिलेला नाही जिथे जिथे राम मंदिर आहे तिथे तिथे भाजपची सत्ता गेली असून आमचा राम अद्याप तिकडे कसा काय राहिला याचे आश्चर्य वाटत असले
तरी आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून संजीवराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांनी तुतारी हाती घेण्याचा चांगला निर्णय घेतला आहे
रामराजे शिवाय आम्हाला करमणार नाही मात्र निश्चितच या मतदारसंघात तुतारी वाजणार असून भ्रष्टाचाराचा कळस गाठणाऱ्या भाजपाला घरी बसवा असे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी केले.
ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारताना पैसे खाल्ले त्याला महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही
फलटण मध्ये परिवर्तन घडणार आहेच पण फलटणकरानी मान खटाव कडे पण लक्ष देऊन तिथे तुतारी वाजवावी असे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी केले.
महायुतीत आम्ही होतो मात्र भाजपने आमच्या विरोधकांना ताकद दिली आमच्या विरोधकांनीही ही ताकद आम्हाला व आमच्या कार्यकर्त्यांना खोट्या केसेस मध्ये गुंतवण्यासाठी,
दमदाटी करण्यासाठी वापरली आम्हाला सन्मानाची वागणूक भेटली नाही त्यामुळे आम्ही मूळ पक्षात पुन्हा आलेलो आहे असे आमदार दीपक चव्हाण यांनी सांगितले.
प्रास्ताविकामध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आम्ही जो तुतारी बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे तो कार्यकर्त्यांच्या विचारातून व त्यांच्या दबावापोटी घेतलेला
असून कार्यकर्त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न तालुक्यातील विरोधकांनी केलेला आहे. महायुतीत असताना सुद्धा आम्हाला विचारात घेतले जात नसल्याने आम्ही लोकसभेला विरोधात काम केले
कार्यकर्त्यांवरील होत असलेल्या अन्यायाविरोधात आम्ही कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करूनच खासदार शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आता निर्णय घेतला असताना कार्यकर्त्यांनी कमी पडू नये विधानसभेला तुतारी आलीच पाहिजे असे आवाहन संजिवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
आजच्या सभेसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. राजेगटाच्या शक्ती प्रदर्शनाची सर्वत्र चर्चा सुरू होती.
0 Comments