google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात टक्केवारी आणि भ्रष्टचाराच्या फेऱ्यता जनतेचे कोट्यावधी रुपय मातीत जाण्याची शक्यता पाच वर्षात खावसपूर येथील जल जीवन सह, शाळा दुरुस्ती रस्ते ही काम काम केवळ पैसे मिळवण्याचे साधन

Breaking News

सांगोला तालुक्यात टक्केवारी आणि भ्रष्टचाराच्या फेऱ्यता जनतेचे कोट्यावधी रुपय मातीत जाण्याची शक्यता पाच वर्षात खावसपूर येथील जल जीवन सह, शाळा दुरुस्ती रस्ते ही काम काम केवळ पैसे मिळवण्याचे साधन

सांगोला तालुक्यात टक्केवारी आणि भ्रष्टचाराच्या फेऱ्यता जनतेचे कोट्यावधी रुपय मातीत जाण्याची


शक्यता पाच वर्षात खावसपूर येथील जल जीवन सह, शाळा दुरुस्ती रस्ते ही काम काम केवळ पैसे मिळवण्याचे साधन

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला / प्रतिनिधी - गेल्या पाच वर्षात संपूर्ण सांगोला तालुक्यात टक्केवारी, कामचुकार अधिकारी व निकृष्ट कामातून होणारा

 भ्रष्टाचार हा चर्चेचा विषय ठरला आहे यात आघाडीवर असलेलं एक गाव म्हणजे खवासपूर शेतकरी कामगार पक्षाची ग्रामपंचायत असताना पूर्वीची राष्ट्रीय पेयजल 

योजना ही ८७ लाख रु ची योजना २०१६-१७ साली पूर्ण झाली जवळपास ९०% वस्त्यावर सुरळीत पाणी पुरवठा सुरु आहे व ही योजना एक आदर्श अशी ठरली आहे आता तीच नाव बदलली गेलीली राष्ट्रीय पेयजल योजना

 केवळ १० टक्के वस्ती वर चुकीचा आराखडा करून तब्बल १ कोटी ५७ लाख रु खर्चून ठेकेदार याला कसा लाभ होईल याची काळजी घेतली यात अधिकारी सामील असल्यामुळे व लोकप्रतिनिधीचे पाठबळ 

असल्यामुळे अतिशय निकृष्ट साहित्य (पाईप, सिमेंट, कमी खोलीची चारी )वापरून अर्धवट काम करून दोन पैकी एक टाकी निकृष्ट साहित्य वापरून एक बांधलीच नाही असं काम करून बहुतांश बिल काढून 

दीड ते दोन वर्ष काम बंद व अर्धवट सोडल गेलं आहे अनेक ठिकाणी पाईप जोडले नाहीत व खुप कालावधी झाल्याने चिखल मातीने बंद झाल्या आहेत संबंधित ठेकेदाराने काम तात्काळ दर्जेदार करावे 

व निकृष्ट कामाची चौकशी करावी अशी ग्रामस्थांनी मागणी केल्यावर चौकशी अंति उप अभियंता निलंबित झाला आहे 

पण कोट्यावधी रु वाया जाणार याला जबाबदार कोण?? गावात मूलभूत सुविधा असताना परत केवळ ठेकेदार मोठे झाले पाहिजेत

 या हेतूने अनेक कामे कागदार दाखवून पैसे खर्ची टाकले गेले सर्वात जुनी व मुख्य चौकातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दुरुस्ती कामात झालेला भ्रष्टाचार तर उघड दिसत असताना सत्तेचा वापर करून दडपला गेला

 हे सर्वांनी पाहिलं. ४० किलोमीटर वरून तालुक्यातील कोणत्या ही कार्यालयात जर शेतकरी,सर्वसामान्य लोकं कामानिमित्त गेली

 तर अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून आर्थिक पिळवणूक इथकी मोठ्या प्रमाणात होत आहे

 याला गरीब शेतकरी, शेतमजूर,अपंग,निराधार लोकं सुद्धा अपवाद नाहीत.

 विशेष करून पंचायत समिती व जिल्हा परिषद बांधकाम व पाणीपुरवठा शाखा याला प्रशासक असल्यामुळे मनमानी सुरु आहे, 

तहसिल व भूमी अभिलेख कार्यालयात तर खिसा रिकामा केल्या शिवाय काम होत नाही. 

*पाणीदार पाणीदार म्हणून पाठ थोपटून घेणारे टँकर ची वेळ आल्यावर गप्प,गावाला एवढा निधी आला तो वाया जात

 असताना गावाला गेल्या वर्षी शिरभावी योजनेच्या ढिसाळ नियोजनाने पाण्यासाठी टँकर वर अवलंबून राहावे लागले

 तारी ग्रामपंचायत च्या नूतन पदाधिकारी यांनी विठलापूर व दिघंची येथील शेतकऱ्यांकडून पाणी आणून पाण्याचे योग्य नियोजन केले

Post a Comment

0 Comments