विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोमाने तयारीला लागावे - रणजितसिंह निंबाळकर
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (तालुका प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीनंतर सध्या चार विधानसभा मतदारसंघात आपण ठरवेल
तोच आमदार होईल अशी परिस्थिती आहे. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत नरेटीव्ह सेट केल्याने लोकसभेत पराभव झाला. कार्यकर्त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करावे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपचे संघटन वाढविण्यासाठी जोमाने तयारीला लागावे असे आवाहन माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी व्यक्त केले.
सोलापूर जिल्हा पश्चिम जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर,
भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, यावेळी सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, सोलापूर जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे, गणेश चिवटे, युवा नेते दिग्विजय बागल, शिवाजी गायकवाड, हणमंत सुळ, योगेश बोबडे,
रामभाऊ ढाणे, जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आलदर, नवनाथ पवार, सोपान नानवर, बाळासाहेब सरगर, प्रतीक्षा गोफणे, संध्या कुंभेजकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात १४ मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सोमवार १६ सप्टेंबर रोजी हॉटेल जोतिर्लिंग वाढेगाव नाका
सांगोला या ठिकाणी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या उपस्थितीत नूतन मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यासाठी मुलाखती घेण्यात आल्या.
चौकट
विरोधकांच्या फेक नरेटिव्हला भाजप कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर द्यावे - चेतनसिंह केदार सावंत
भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना संघटनेत काम करण्याची संधी देण्यात येणार आहे.
विधानसभेसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी रणनिती तयार करून कामाला लागावे. विरोधकांच्या फेक नरेटिव्हला त्याच भाषेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर द्यावे.
विरोधकांच्या फेक नेरेटिव्हला उत्तर देताना विकासाचा अजेंडाही पुढे घेऊन जावा, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने घेतलेले निर्णय लोकांपुढे घेऊन जावे असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले.
0 Comments