google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज! बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपीने स्वत:वरच झाडून घेतली गोळी, अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी झाडल्या गोळ्या; सिनेस्टाईल थरार

Breaking News

ब्रेकिंग न्यूज! बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपीने स्वत:वरच झाडून घेतली गोळी, अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी झाडल्या गोळ्या; सिनेस्टाईल थरार

ब्रेकिंग न्यूज! बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपीने स्वत:वरच झाडून घेतली गोळी,


अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी झाडल्या गोळ्या; सिनेस्टाईल थरार 

राज्यात बदलापूरच्या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे, असं असतानाच आता बदलापूरातील शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीने पोलिसांच्या बंदुकीने गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना अक्षय शिंदेंने पोलीसांची बंदूक हिसकावून स्वत:वर गोळी झाडली आहे. पोलिसांच्या बंदुकीने गोळी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तीन राऊंड फायर झाल्याची माहिती मिळत आहे.

यामध्ये अक्षय गंभीर जखमी झाला आहे. या वेळी अक्षयला वाचवण्यासाठी गेलेले पोलीस अधिकारी देखील जखमी झाले आहे. 

अक्षयची प्रकृती गंभीर आहे. हा एन्काऊंटर नसून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. सध्या अक्षयची प्रकृती अतिशय गंभीर असून त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अक्षय शिंदे याची बदलापूर बलात्कार प्रकरणात चौकशी सुरू आहे. एसआयटीकडून त्याची चौकशी सुरू आहे.

 त्याला कोठडीही देण्यात आली होती. त्यामुळे त्याला तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. मात्र, आणखी एका गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्यासाठी बदलापूर पोलीस आज तळोजा येथे आले होते.

सकाळी 5.30 वाजता पोलीस तळोजा कारागृहात पोहोचले होते. अक्षयचा ताबा घेऊन त्याला बदलापूरकडे नेत असताना ठाण्याच्या हद्दीत अक्षयने पोलिसांच्या हातून

 बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर सेल्फ डिफेन्ससाठी गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.

मात्र, पोलिसांनी या वृत्ताला अद्याप दुजोरा दिला नाही. या झटापटीत एका पोलिसालाही गोळी लागल्याने हा पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसाची प्रकृती गंभीर आहे.

कोण आहे नराधम अक्षय शिंदे?

अक्षय शिंदेचे वय 24 वर्षे अक्षयचे शिक्षण दहवीपर्यंत अक्षय शिंदे बदलापूर येथील एका शाळेचा शिपाई या आधी अक्षय एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता

एका कंत्राटामार्फत आदर्श शाळेत शिपाई म्हणून लागला. अक्षय,आई-वडील आणि त्याचा भाऊ आणि भावाची बायको असे त्याचे कुटुंब अक्षयची तीन लग्न झाली होती मात्र तिनही बायका सोडून गेल्या होत्या अक्षय कर्नाटकातील गुलबर्गा या गावातील मात्र अक्षयचा जन्म बदलापूरमधील खरवई गावात आरोपीनं दिली होती गुन्ह्याची कबुली

विशेष तपास पथकाने (एसआयटी) बदलापूरच्या एका शाळेतील दोन बालिकांवरील लैगिक अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे. शाळेचे कर्मचारी, डॉक्टर, 

फॉरेन्सिक अधिकारी आणि तहसील अधिकारी यांच्यासह 20 पेक्षा अधिक व्यक्तींच्या साक्षीचा सहभाग असून आरोपीने एका मुलीला मारहाण केल्याचे तिने सांगितले होते.

प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा आरोपीने या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत सहभाग असल्याचे पोलीस चौकशीत, तसेच डॉक्टरांसमोरही मान्य केले होते. डॉक्टरांसमोर आरोपीने दिलेली माहिती या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो, असे अधिकान्याने सांगितले. 

भारतीय न्याय संहिता व पोक्सो कायद्यातील 183 तरतुदीनुसार दोन्ही यालिकांचा जयाब नोंदवण्यात आला आहे. याशिवाय ओळखपरेडमध्येही आरोपीला पीडित मुलींनी ओळखले आहे.

Post a Comment

0 Comments