मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू
आणि नाभिक समाजाला न्याय मिळवून देऊ. आमदार शहाजी बापू पाटील
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ कार्यान्वित करून त्यावरती संचालक मंडळ तयार करावे
नाभिक समाजाचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण
सांगोला / महाराष्ट्र शासनाने नाभिक समाजासाठी स्थापन केलेले संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ कार्यान्वित करून त्यावरती संचालक मंडळ तयार करून कार्यान्वित करण्याबाबत शासन स्तरावरून कोणतीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे शासनाने नाभिक समाजाची फसवणूक केली ?
अशी भावना व्यक्त करून सकल नाभिक समाज महाराष्ट्र राज्य व आदर्श नाभिक समाज मंडळ सांगोला यांच्या वतीने
काल मंगळवार १० सप्टेंबर पासून सांगोला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान उपोषणाच्या पहिल्या दिवशी आम. शहाजीबापू पाटील, यांनी भेट दिली.
प्रा संजय देशमुख, संभाजी ब्रिगेडचे अरविंद नाना केदार,
आरपीआयचे तालुका अध्यक्ष खंडू तात्या सातपुते, बहुजन क्रांती मोर्चाचे बापूसाहेब ठोकळे, बहुजन समाज पार्टीचे नेते कुंदनजी बनसोडे, मिलिंदजी बनसोडे, कोळी महासंघाचे शंभू माने यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक संघटनेकडून उपस्थित राहून नाभिकसमाजाच्या मागण्या रास्त आहेत.
संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ कार्यान्वित करून त्यावरती संचालक मंडळ तयार करावे
सदरच्या मागण्या सोडवण्यासाठी लवकरच मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू आणि नाभिक समाजाला न्याय मिळवून देऊ. आमदार शहाजी बापू पाटील यांनी बोलताना सांगितले
सांगोला आदर्श नाभिक सेवा मंडळाचे अध्यक्ष किसन खंडागळे हे आमरण उपोषणाला बसले आहेत
तर उपोषणप्रसंगीकार्याध्यक्ष शंकर काळे, सहकार्याध्यक्ष गौरव काळे, व उपाध्यक्ष संतोष जगताप, सोमनाथ खंडागळे, रामदास काळे, साहेबराव जाधव, कमलाकर भोसले, उदय माने, समाधान सुरवसे,
सुनील खंडागळे, विकास चव्हाण, सचिव मनोज खंडागळे, सहसचिव सोमनाथ गवळी, शहराध्यक्ष सचिन गवळी, विनायक सागावकर, महेश चौधरी, वैभव भोसले, आदी नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाभिक बहुजन समाजाच्या वर्षानुवर्ष मागण्या प्रलंबित आहेत तसेच या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत सकल नाभिक समाज महाराष्ट्र राज्यातील सांगोला येथे सुरू असलेले उपोषण आंदोलनावर ठाम असल्याचे उपोषण करते किसन खंडागळे व कार्याध्यक्ष शंकर काळे यांनी सांगितले.
0 Comments