google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी.. सांगोल्यात ग्रामदैवत श्री अंबिकादेवी मंदिरात 3 ऑक्टोबरपासून शारदेय नवरात्र महोत्सवास सुरूवात

Breaking News

मोठी बातमी.. सांगोल्यात ग्रामदैवत श्री अंबिकादेवी मंदिरात 3 ऑक्टोबरपासून शारदेय नवरात्र महोत्सवास सुरूवात

मोठी बातमी.. सांगोल्यात ग्रामदैवत श्री अंबिकादेवी मंदिरात 3 ऑक्टोबरपासून शारदेय नवरात्र महोत्सवास सुरूवात


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री अंबिका देवी देवस्थान समिती व श्री तुळजाभवानी नवरात्र महोत्सव मित्र मंडळ जुने मंदिर सांगोला यांच्या वतीने गतवर्षी प्रमाणे

 याही वर्षी गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 ते बुधवार दिनांक 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात आयोजित केला असून भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा

 व शारदीय नवरात्र महोत्सवाची ग्रामदैवत श्री अंबिका देवी मंदिरात युद्धपातळीवर तयारी सुरू असल्याची माहिती श्री अंबिका देवीचे मुख्य पुजारी मयुरेश दत्तात्रय गुरव यांनी दिली.

सदर नवरात्र उत्सव काळात होणारे कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे

गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर अश्‍विन शु प्रतिपदा (1) घटस्थापना, महाभिषेक महापूजा पहाटे चार वाजता, उपासना 5:15, आरती 6 वाजता. दुपारी 12 वाजता सालंकृत अलंकार महापूजा, सायंकाळी 4 वाजता महिला भजनी मंडळ भजन सेवा. रात्री 8 वाजता आरती व प्रसाद.

 शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024 अश्‍विन शु द्वितीय (2) महाभिषेक महापूजा पहाटे चार वाजता, उपासना 5:15, आरती 6 वाजता. दुपारी 12 वाजता सालंकृत अलंकार महापूजा, सायंकाळी 4 वाजता भजन सेवा. 

रात्री 8:15 वाजता आरती व प्रसाद. शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर 2024 अश्‍विन शु तृतीया (3) महाभिषेक महापूजा पहाटे चार वाजता, उपासना 5:15 आरती 6 वाजता. दुपारी 12 वाजता सालंकृत 

अलंकार महापूजा, सायंकाळी 4 वाजता भजन सेवा. रात्री 8:30 वाजता आरती व प्रसाद, रविवार दिनांक 6 ऑक्टोबर 2024 अश्‍विन शु तृतीया(3) महाभिषेक महापूजा पहाटे चार वाजता उपासना, 5:15 आरती 6 वाजता. दुपारी 12 वाजता

 सालंकृत अलंकार महापूजा, सायंकाळी 4 वाजता भजन सेवा. रात्री 8:45 वाजता आरती व प्रसाद. सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर 2024 अश्‍विन शु चतुर्थी 

(4) महाभिषेक महापूजा पहाटे चार वाजता, उपासना 5:15 आरती 6 वाजता. दुपारी 12 वाजता सालंकृत अलंकार महापूजा, सायंकाळी 4 वाजता भजन सेवा. रात्री 9 वाजता आरती व प्रसाद. 

मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर 2024 अश्‍विन शु पंचमी (5) महाभिषेक महापूजा पहाटे चार वाजता, उपासना 5:15, आरती 6 वाजता. दुपारी 12 वाजता सालंकृत अलंकार महापूजा,

 महिला हदगा भोंदला कार्यक्रम. सायंकाळी 4 वाजता महिला भजनी मंडळ भजन सेवा. रात्री 9:15 वाजता आरती व प्रसाद, बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर 2024 अश्‍विन षष्ठी (6) महाभिषेक महापूजा पहाटे चार वाजता.

 उपासना 5:15. आरती 6 वाजता. दुपारी 12 वाजता सालंकृत अलंकार महापूजा, सायंकाळी 4 वाजता भजन सेवा. रात्री 9:30 वाजता आरती व प्रसाद. गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 

अश्‍विन शु सप्तमी (7) महाभिषेक महापूजा पहाटे चार वाजता. उपासना 5:15 आरती, 6 वाजता. दुपारी 12 वाजता सालंकृत अलंकार महापूजा, सायंकाळी 4 वाजता 

महिला भजनी मंडळ भजन सेवा. रात्री 9:45 वाजता आरती व प्रसाद. शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर 2024 अश्‍विन शु अष्टमी (8) महालक्ष्मी दुर्गाष्टमी महा उपवास

 महाभिषेक महापूजा पहाटे 4 वाजता, उपासना 5:15 आरती 6 वाजता. दुपारी 12 वाजता सालंकृत अलंकार महापूजा, सायंकाळी 4 वाजता भजन सेवा. रात्री  10 वाजता छबिना, रात्री 12:30 वाजता होम.

शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर 2024 अश्‍विन शु नवमी (9) दसरा/ खंडे नवमी/विजयादशमी/दसरा पहाटे 4 वाजता

 महा अभिषेक, 5 वाजता उपासना, ्र6 वाजता आरती, दुपारी 12 वाजता महापूजा, महानैवेद्य सायंकाळी 4 वाजता भजन सेवा. रात्री 9 वाजता आरती आणि प्रसाद.

रविवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 एकादशी, सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर 2024 एकादशी द्वादशी मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी त्रयोदशी या तीन दिवसात निद्रा काल 

असून हे तीन दिवस श्री अंबिकादेवी मंदिर बंद राहील. बुधवार दिनांक 16 ऑक्टोबर 2024 कोजागिरी पौर्णिमा. पहाटे चार वाजता काकडा, 4ः30 वाजता

 प्रक्षळपूजा, 5 वाजता अभिषेक उपासना, 6 वाजता आरती. दुपारी 12 वाजता महापूजा महानैवेद्य. सायंकाळी 4 वाजता भजन सेवा. रात्री 9 वाजता महाआरती, छबिना कोजागिरी उत्सव.

याप्रमाणे सर्व कार्यक्रम श्री तुळजाभवानी नवरात्र महोत्सव मित्र मंडळ जुने मंदिर सांगोला यांच्या वतीने ग्रामदैवत श्री अंबिका देवी मंदिरात संपन्न होणार 

असून भाविक भक्तांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री अंबिका देवी चे मुख्य पुजारी मयुरेश गुरव यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments