धक्कादायक.. सांगोलामधून पुण्याच्या दिशेने निघालेल्या खासगी प्रवाशी बसचा भीषण अपघात;
टायर फुटून बस 25 फूट खाली घसरली अन्...13 हून अधिक प्रवासी जखमी
सांगोला : इंदापूर बाह्यवळण मार्गालगत गलांडवाडी नंबर एक गावच्या हद्दीत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सांगोल्याकडून पुण्याकडे निघालेल्या खाजगी प्रवाशी वाहतूक बसचा टायर फुटल्याने बस मालवाहू ट्रकला धडकली
यामध्ये बसमधील 13 हून अधिक प्रवासी जखली झाले असून बस टायर फुटल्याने समोरील ट्रकला धडक देत बस रस्ता सोडून 25 ते 30 फूट खाली घसरली.
यामध्ये जखमी 13 प्रवाशांना इंदापुरात उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी (ता. 08) रोजी सायंकाळच्या 7 वाजताच्या दरम्यान पुणे सोलापूर राष्ट्रीय
महामार्गावर इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी गावचे हद्दीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथून पुण्याच्या दिशेने निघालेली
खाजगी बस क्रमांक (एम.एच. 09 के. एफ. 5969) हिचा टायर फुटल्याने पुढे पुण्याच्या दिशेने निघालेल्या लोखंड वाहतूक करणाऱ्या ट्रकला (क्रमांक टि.एन. 93 बी 3062) पाठीमागून या बसने धडक दिली.
या अपघातात ट्रक मधील असणारा लोखंड देखील रस्त्यावर विखुरले जात ट्रकचे मोठे नुकसान झाले. तसेच बस पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडून जवळपास 25 फूट खाली जाऊन आदळली.
या बसमधील 13 प्रवासी गंभीर जखमी झाले असून या जखमींना इंदापूर पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलिस आणि राष्ट्रीय महामार्गाचे पथक या ठिकाणी दाखल होत त्यांनी जखमी प्रवाशांना बाहेर काढत उपचारासाठी इंदापूरला पाठवले तसेच रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.
सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी बस आणि खाजगी मालवाहू ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची प्राथमिक नावे खालील प्रमाणे
१) मंगल मारुती कदम (वय ६५ रा.सांगोला)
२) सुनील जाधव (वय ३२ वर्षे,रा.नाझरा),
३) नवनाथ अरुण पिसे, (वय२३ वर्षे रा. पिलीव)
४) मनीषा सतीश यादव (वय ३८ वर्षे रा.महुद) ५) भुपालसिंह संभाजी घाडगे (वय२४ वर्षे आलेगाव ता.सांगोला)
६) नानासो तात्यासो इंगवले (वय ६३वर्षे)
७) रूपाली श्रीकांत दुधाडे ( वय ३२वर्षे रा.तांदुळवाडी)
८) विराज श्रीकांत दुधाडे (वय 6 वर्षे),
९) याकुब शेख (वय ३५ वर्ष रा.वाडीचिंचोली)
१०) आरिफ याकूब शेख (वय ५ वर्षे)
११) मयूर मुरलीधर सागर(वय ३४ वर्षे, रा.आटपाडी)
१२) प्रतीक्षा सचिन बोथरे (वय २२ वर्षे)
१३) प्रवीण दादासाहेब रणदिवे, (वय २९वर्षरा. जंक्शन ,ता. इंदापूर)
0 Comments