google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नितीन धवणे – पाटील यांना “सह्याद्री रत्न पुरस्कार” २०२४ जाहीर

Breaking News

नितीन धवणे – पाटील यांना “सह्याद्री रत्न पुरस्कार” २०२४ जाहीर

नितीन धवणे – पाटील यांना “सह्याद्री रत्न पुरस्कार” २०२४ जाहीर   


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

पुरस्कार वितरण सोहळ्याच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार.

शिरभावी  :-  महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, भारत सरकार सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्यम मंत्रालय या विभागात नोंदणीकृत असलेल्या सह्याद्री रत्न महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत समाज, संस्कृती, 

यांचे संवर्धन व लोकशाही विचारांना एकत्र करणारा आणि जगण्याला ध्येय बनवणाऱ्या ऐतिहासिक गुणवत्तेचा सर्वश्रेष्ठ सन्मान सोहळा व “सह्याद्री रत्न पुरस्कार वितरण सोहळा” पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

 या सह्याद्री रत्न पुरस्कार वितरण सोहळयात विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये नितीन धवणे – पाटील यांना या सह्याद्री रत्न पुरस्कार वितरण सोहळयात देण्यात येणारा

 “सह्याद्री रत्न पुरस्कार” २०२४  हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे . नितीन धवणे – पाटील यांना  उद्योग व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अत्यंत मानाचा समजला जाणारा

 “सह्याद्री रत्न पुरस्कार” २०२४ हा  पुरस्कार जाहीर झाला आहे . पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती सह्याद्री रत्न महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ. दिपक जाधव यांच्या कडून निवड पत्राद्वारे देण्यात आली आहे. 

सह्याद्री रत्न महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या निवड समितीने नितीन धवणे – पाटील यांची निवड या पुरस्कारासाठी केली आहे. तसेच याच पुरस्कार वितरण सोहळ्याच्या व्यासपीठावरती ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचे खूप मोठे नाव आहे. तसेच ते रियल इस्टेट या क्षेत्रामध्येही प्रसिद्ध आहेत. या सह्याद्री रत्न पुरस्कार वितरण सोहळयात साहित्य, कला, सामाजिक, क्रिडा, सांस्कृतिक, उद्योग, पर्यटन, अपंग निराधार महिला,

 वन्यजीव, व्यवसाय, शैक्षणिक, आरोग्य, सार्वजनिक सेवा, स्वायत्त संस्था, सहकार, पत्रकारिता, कृषी अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने उत्तुंग शिखर गाठलेल्या, पैशाला महत्त्व आलेल्या जगात

 जनसेवेचे व्रत घेतलेल्या व त्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या व सेवेसाठी आपले आयुष्य व्यतीत करणाऱ्या सन्मान मूर्तींना विविध क्षेत्रातील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. उदात्त हेतूने निस्वार्थीपणे कार्य करणारी माणसे, 

दखल घेतल्या न गेलेल्या अव्याहतपणे राबणाऱ्या अदृश्य हातांना सन्मानित करून पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे काम पुरस्काराच्या निमित्ताने सह्याद्री रत्न महाराष्ट्र राज्य ही संस्था करणार आहे. हा या संस्थेचा या पाठीमागचा उदात्त हेतू आहे. 

    नितीन धवणे – पाटील यांची उद्योग  व इतर क्षेत्रातील कामगिरी पाहून सह्याद्री रत्न महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड  केली आहे . हा पुरस्कार जाहीर झाल्याने धवणे – पाटील हायटेक फार्मच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 या पुरस्काराचे स्वरूप  फेटा, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, मेडल असे आहे. या पुरस्कारासाठी निवड झाल्याने त्यांचे निकटवर्तीय, नातेवाईक, ग्रामस्थ, व मित्र परिवार यांच्या कडून शुभेच्छा देण्यात येत आहेत व त्यांच्यावरती कौतुकांचा वर्षाव होत आहे . 

सदर पुरस्कार वितरण सोहळा  प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत वार रविवार दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी पत्रकार भवन, पुणे या ठिकाणी पार पडणार आहे . अशी माहिती संस्थापक अध्यक्ष मा.डॉ. दिपक जाधव यांच्याकडून देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments