google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात सुमारे अडीच ते तीन हजार शिधापत्रिका वाढणार ; मा.आम. दिपकआबांच्या प्रयत्नाला यश तालुक्यातील सुमारे ११ हजार नागरिकांना मिळणार शिधापत्रिकाचा लाभ

Breaking News

सांगोला तालुक्यात सुमारे अडीच ते तीन हजार शिधापत्रिका वाढणार ; मा.आम. दिपकआबांच्या प्रयत्नाला यश तालुक्यातील सुमारे ११ हजार नागरिकांना मिळणार शिधापत्रिकाचा लाभ

सांगोला तालुक्यात सुमारे अडीच ते तीन हजार शिधापत्रिका वाढणार ;


मा.आम. दिपकआबांच्या प्रयत्नाला यश तालुक्यातील सुमारे ११ हजार नागरिकांना मिळणार शिधापत्रिकाचा लाभ 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला ; तालुका प्रतिनिधी २०१३ रोजी झालेल्या चुकीच्या सर्वेक्षनानुसार सांगोला तालुक्यातील अनेक शिधापत्रिका बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे सांगोला तालुक्यातील अनेक गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली होती.

 ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सांगोला तालुक्याचा इष्टांक वाढवून मिळावा

 अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. दिपक आबांच्या मागणीला अखेर यश आले असून शिधापत्रिकेपासून वंचित असलेल्या नवीन ११ हजार नागरिकांना आता शिधापत्रिकेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

२०११ रोजी झालेल्या जनगनणेच्या आधारे सांगोला तालुक्याचा इष्टांक ७६.३२ इतका निश्चित करण्यात आला होता. 

परंतु २०१३ रोजी झालेल्या सर्वेक्षणात राजकीय हस्तक्षेप झाल्याने तालुक्यातील हजारो नागरिकांना शिधापत्रिकापासून वंचित राहावे लागत होते. सांगोला तालुक्यातील हजारो नागरिकांची अत्यंत महत्त्वाची समस्या लक्षात घेऊन माजी

 आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी गेल्या महिन्यात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन सांगोला तालुक्यातील जनतेला इष्टांक वाढवून देण्याची लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. दिपकआबांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन

 राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत संबंधित विभागाला आदेश दिले. याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी श्री सरडेसो आणि सांगोल्याचे तहसीलदार संतोष कणसे यांना पत्र देऊन 

सांगोला तालुक्यात नव्याने ११ हजार युनिट्स किंवा सुमारे अडीच हजार शिधापत्रिका वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तहसीलदार संतोष कणसे यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामदक्षता समितीला लेखी पत्र पाठवून

 ग्रामीण भागात शिधापत्रिकेपासून वंचित असलेल्या नागरिकांची तसेच गावात राहणाऱ्या विधवा, परितक्त्या महिला दिव्यांग व्यक्ती, अन्नसुरक्षा योजना तसेच निराधार नागरिकांची माहिती मागवली आहे. प्रत्येक गावात ग्रामदक्षता समितीचे 

अध्यक्ष म्हणून त्या गावचे सरपंच तर सचिव म्हणून त्या गावचे तलाठी आणि सदस्य म्हणून ग्रामसेवक काम पाहतात. शिधापत्रिकेच्या लाभापसून वंचित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर नव्याने शिधापत्रिका मिळणार

 असून या शिधापत्रिकेवर शासनाच्या मोफत अन्नधान्य योजनेचा लाभही मिळणार असल्याने तालुक्यातील हजारो वंचित नागरिकांमधून आता आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

चौकट ; 

१) महाराष्ट्र राज्य सरकार आणि ना छगन भुजबळ यांची विशेष अभिनंदन 

सांगोला तालुक्यातील हजारो नागरिकांना शिधापत्रिका बंद झाल्याने उपासमारीची वेळ आली होती. सांगोल्यातील हजारो नागरिक याबाबत दररोज तक्रारी करत होते. 

अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या तालुक्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण मागणीची महाराष्ट्र राज्य सरकारने तसेच विशेषता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दखल घेऊन 

सांगोला तालुक्यात सुमारे अडीच ते तीन हजार नवीन शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या सरकारचे आणि छगन भुजबळ यांचे 

सांगोला तालुक्याच्या वतीने आम्ही सदैव आभारी राहू आणखी जे पात्र लाभार्थी शिधापत्रिका पासून वंचित राहतील त्याबाबतही वरिष्ठांनी शब्द दिला आहे त्यानुसार एकही पात्र लाभार्थी शिधापत्रिका पासून वंचित राहणार नाही याची प्रकर्षाने काळजी घेऊ ; 

मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील 

जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

Post a Comment

0 Comments