सांगोला तालुक्यातील कोळे येथील समाधान आलदर यांचे सर्व कुटुंबासह तहसिल कार्यालय सांगोला येथे आमरण उपोषण सुरू...!
शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२
सांगोला प्रतिनीधी (डेव्हिल) :- कोळे ता.सांगोला येथील सामाजिक कार्यकर्ते समाधान आलदर व त्यांच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाविरोधात तहसिल कार्यालय
सांगोला या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण बसले आहे.त्यामधील प्रमुख मागण्या
१. श्रीमती. इंदुबाई भानुदास आलदर यांच्या कुटुंबावर अन्याय करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक करून त्यांचेवर कडक कारवाई करण्यात यावी.
२. या केस प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्या तपास अधिकारी यांना निलंबित करून प्रामाणिक तपास अधिकारी नेमण्यात यावा.
३. मला व माझ्या कुटुंबाला जीवितास धोका असल्याने पोलीस संरक्षण मिळावे.
उपोषण कर्ते:-१.इंदुबाई भानुदास आलदर २.समाधान भानुदास आलदर ३.सौ.सुरेखा समाधान आलदर. हे दि.१५ ऑगस्ट २०२४ पासून बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहे.
जो पर्यन्त योग्य तो न्याय मिळत नाही तो पर्यंत हे बेमुदत आमरण उपोषण सुरू राहील.असे उपोषण करते यांनी सांगितले आहे.
0 Comments