google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक सांगोल्यातील घटना... चोरट्यांनी शिलाई मशिनसह पळविली मोटार सायकल

Breaking News

खळबळजनक सांगोल्यातील घटना... चोरट्यांनी शिलाई मशिनसह पळविली मोटार सायकल

खळबळजनक सांगोल्यातील घटना... चोरट्यांनी शिलाई मशिनसह पळविली मोटार सायकल


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:-अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन मोटार सायकल, शिलाई मशिन व रोख रक्कम असा 37 हजार रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला असल्याची घटना कटफळ ता.सांगोला येथे घडली.

चोरट्यांनी  30 हजार रुपये किंमतीची मोटार सायकल, 5 हजार रुपयांची  एक शिलाई मशीन व रोख 2000 रुपये असा एकूण 37,000/- रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेला आहे.

 चोरीची फिर्याद विलास शामराव पोतदार, वय-64 वर्षे, व्यवसाय शेती, रा.कटफळ, ता.सांगोला) यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 15 जुलै 2024 रोजी दुपारी 01.30 वा. चे सुमारास फिर्यादी यांची स्वताची मोटार सायकल  ही घरी कटफळ येथे घरी लावून एस टी बसने मुलाला भेटण्यासाठी फलटण येथे गेले होते. 

तेथे राहून विनांक 16 जुलै रोजी 2024 रोजी सायंकाळी 07.30 वा चे सुमारास घरी कटफळ येथे आले होते.

त्यावेळी घराचा दरवाजा उघडा असलेला दिसला त्यामुळे फिर्यादी यांनी घरात जावून पाहीले असता घरात लावलेली  मोटार सायकल दिसून आली नाही,

 तसेच घरातील शिलाई मशीन, व कपाटात ठेवलेली रोख रक्कम मिळुन आली नाही तसेच कपडे व इतर सामान अस्थाव्यस्त पडलेले दिसून आले.

त्यामुळे चोरी झाल्याचे खात्री झाल्याने घरातील मोटार सायकल, शिलाई मशीन, रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments