ब्रेकिंग न्यूज..सांगोला तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांच्या दक्षता समित्या कागदावरच
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुक्यातील पश्चिम भागातील जुनोनी, डोंगर पाचेगाव, किडविसरी, कोळे, कराडवाडी जुजारपूर, नाझरा, हातीद भागात स्वस्त धान्य दुकानांत धान्याचे वाटप
सुरळीत व पारदर्शकरीत्या व्हावे म्हणून शासनाने तालुका व ग्रामपंचायत स्तरावर दक्षता समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
परंतु तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये दक्षता समितीची स्थापनाच करण्यात आली नसल्याचे वास्तव आहे.
काही ग्रामपंचायतींमध्ये समित्या फक्त कागदोपत्रीच आहेत. त्यामुळे या समित्यांची नव्याने रचना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
ग्रामीण भागात या दक्षता समितीचा वचक राहात असल्याने पूर्वी दुकानदार स्वस्त धान्य पुरवठा वेळेवर करीत होते.
सध्या मात्र काही दुकानदार शासनाचा आदेशही मानत नसल्याचे बोलले जात आहे. अनेकदा एकाच
नव्याने समित्या नेमणूक करण्याची नागरिकांची मागणी
वेळी धान्य मिळत नसल्याने लाभार्थी ग्राहकांना दुकानदाराकडे चकरा माराव्या लागतात.
याबाबत तक्रार केल्यास त्या लाभार्थ्याला त्रास दिला जातो, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. दक्षता समित्यांच्या बैठका नियमितपणे आयोजित न केल्यास सर्व स्तरांवरील दक्षता समित्यांच्या
सदस्य सचिवांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश आहेत. मात्र काही ग्रामपंचायत स्तरावर बैठका होत नाहीत. काही ठिकाणी केवळ कागदावरच
या समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. शासनाने या समित्यांच्या बैठकांबाबत चौकशी करुन कार्यवाही करावी व नव्याने समित्या नेमाव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
0 Comments