google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..अनेकांना जीवनदान दिलं पण..; सोलापुरातील महिला डॉक्टरनं उचललं टोकाचं पाऊल

Breaking News

खळबळजनक..अनेकांना जीवनदान दिलं पण..; सोलापुरातील महिला डॉक्टरनं उचललं टोकाचं पाऊल

खळबळजनक..अनेकांना जीवनदान दिलं पण..; सोलापुरातील महिला डॉक्टरनं उचललं टोकाचं पाऊल


सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात मोहोळ येथे एका महिला डॉक्टरने औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. ही घटना पेनूर गावातील आहे.

मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील महिला डॉक्टरने औषध पिऊन आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. 

आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. पंढरपूर जयश्री गवळी शहर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

डॉ. जयश्री प्रशांत गवळी (वय ३८) असे मृत महिला डॉक्टराचे नाव आहे. पेनूर येथील साई कृपा हॉस्पिटलमध्ये पती डॉ. प्रशांत केराअप्पा गवळी यांच्यासोबत स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून डॉ. जयश्री गवळी सेवा देत होत्या.

गेल्या दहा ते बारा वर्षांपासून साईकृपा हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना गवळी दाम्पत्य सेवा देत होते. शुक्रवारी दुपारी तीनच्या 

सुमारास डॉ. जयश्री गवळी या बेशुध्द अवस्थेत आढळून आल्या. त्याना तातडीने पंढरपूर येथील लाइफ केअर हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले.

उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टम झाल्यावर डॉ.जयश्री गवळी यांचा मृतदेह पेनूर येथे आणण्यात आला.

रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. जयश्री गवळी यांच्या मागे पती, दोन मुली, व एक मुलगा आहेत.

महिला डॉक्टर आत्महत्येची महिनाभरात दुसरी घटना

डॉ. ऋचा सूरज रुपनर यांनी सांगोला येथील निवासस्थानी ६ जून रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली. 

ही घटना ताजी असतानाच आणखी एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने वैद्यकीय क्षेत्राला धक्काच बसला आहे.

Post a Comment

0 Comments