google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ....सांगोला तालुक्यात तरुणाचा खून; संतप्त नातेवाईकांचा महूद - दिघंची रोडवर रास्ता रोको

Breaking News

धक्कादायक ....सांगोला तालुक्यात तरुणाचा खून; संतप्त नातेवाईकांचा महूद - दिघंची रोडवर रास्ता रोको

धक्कादायक ....सांगोला तालुक्यात तरुणाचा खून; संतप्त नातेवाईकांचा महूद - दिघंची रोडवर रास्ता रोको


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : किरकोळ कारणातून झालेल्या भांडणाच्या रोषातून चिडून तिघांनी मिळून कोयत्यासारख्या मोठ्या धारदार हत्याराने डोक्यात, मानेवर, छातीवर, हातावर, पोटावर गंभीर वार करून

 ३२ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केला.ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. ही घटना महूद (ता. सांगोला) येथील साठे नगर समाज मंदिराजवळ घडली.

सुनील अनिल कांबळे (३२ रा. महूद (साठे नगर ) ता सांगोला) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी 

विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी पोलीस फौज फाट्यासह धाव घेऊन तातडीने संशयितांना ताब्यात घेतले.

दरम्यान सुनील कांबळे खून प्रकरणातील आरोपींना घटनास्थळी आणावे, गुन्ह्यातील मास्टरमाइंडला शोधून काढावे 

या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकासह ग्रामस्थांनी आक्रोश करत महूद- दिघंची रोडवरील साठे नगरजवळ शुक्रवारी सकाळी दीड तास रस्ता रोको केल्याने काही काळ गोंधळ उडाला होता.

 पोलीसांनी सुनील कांबळे खून प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्याने रस्ता रोको मागे घेण्यात आला.

Post a Comment

0 Comments