खळबळजनक ..सांगोला तालुक्यातील सोनंद रोडवर ट्रॅक्टर पलटी होऊन एकाचा मृत्यू
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : ट्रॅक्टर पलटी होवून १ जणाचा मृत्यू तर १ जखमी झाला असल्याची घटना हणमंतगाव ते सोनंद जाणारे रोडवर घडली.
अपघाताची फिर्याद भारत गावडे यांनी दिली आहे. अपघातामध्ये अमोल देवाप्पा आगलावे यांचा मृत्यू झाला आहे.
४ मे २०२४ रोजी रात्रौ १२.३० वाजण्याच्या सुमारास (हणमंतगाव ता. सांगोला) येथील टकले यांचे घराजवळ हणमतगाव ते सोनंद जाणारे रोडवर
अमोल आगलावे यांनी त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टरभरधाव वेगात निष्काळजी पणे हयगयीने चालविल्यामुळे ट्रॅक्टर चा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर रोडचे
बाजुला चारीमध्ये जावुन पलटी झाला. टॅक्टर खाली सापडुन गंभीर जखमी होवुन मयत
होणेस तसेच ट्रॅक्टर मध्ये असलेले शिवराज गावडे यांना गंभीर जखमी करणेस व ट्रॅक्टरचे अंदाजे १ लाख
रुपयाचे नुकसान करण्यास कारणीभुत असल्याचे फिर्यादीत नोंद करण्यात आले आहे
या घटनेचा पुढील तपास पो.हे.कॉ बोराटे हे करीत असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याकडून मि ळाली आहे.
0 Comments