डॉ. परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त अल्प दरात शस्त्रक्रिया होणार; रुग्णांनी लाभ घ्यावा आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी) : ११ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेचा अनुभव असलेले आणि सांगोल्यातील रुग्णांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या खंडागळे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा
युवा नेते डॉ. परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दि.०५ जुलै २०२४ ते बुधवार दि. १० जुलै २०२४ पर्यंत अल्प दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
यासह आज ९ जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
वाढदिवस हा आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस म्हणून अनेक जण मौज, मजा, मस्ती करून साजरा करतात. परंतु सामाजिक बांधिलकी म्हणून खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चे सर्वेसर्वा
डॉक्टर परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त इतरत्र न खर्च करता, गोरगरीब गरजू रुग्णांना अल्पशा दरात शस्त्रक्रिया करून मिळाव्यात
या दृष्टीने शुक्रवार दि.०५ जुलै २०२४ ते बुधवार दि. १० जुलै २०२४ पर्यंत अल्प दरात शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
खंडागळे मल्टी स्पेशालिटी मॅटर्निटी, सर्जिकल मेडिसिन अस्थिरोग, नेत्ररोग त्वचारोग, बालरोग, कान-नाक- घसा, ट्रामा केअर सेंटर येथे सिझेरियन
झाल्यास २०,००० रुपये, नॉर्मल प्रसूती झाल्यास ८००० रुपये, गर्भाशयाची पिशवी काढणे २०,००० रुपये, दुर्बिणीद्वारे गर्भाशयाची पिशवी काढणे २५,००० रुपये, कुटूंब नियोजन दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया
१३,५०० रुपये, गर्भाशयाची पिशवी साफ करणे ९,००० रुपये, कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया टाक्यावरील १०,००० रुपये, लेझरद्वारे मुळव्याध, फिशर व फिच्युला २०,००० रुपये,
बिनालेझरद्वारे मुळव्याध, फिशर, फिच्युला १६,००० रुपये, अपेंडीक्स ऑपरेशन २०,००० रुपये, हर्निया ऑपरेशन २०,००० रुपये, टॉन्सिल्स ऑपरेशन २०,००० रुपये, नाक,
कानाच्या ऑपरेशनमध्ये २५ % सवलत यासह आय.सी.यु. व वार्ड अॅडमिट पेशंटच्या बिलमध्ये २५ % सवलत, ईसीजी १०० व एक्स-रे १०० रुपयांमध्ये दिले जाणार आहेत.
पॅकेज मध्ये हॉस्पीटल, मेडिकल, भूल व लॅबचा खर्च समाविष्ट असणार आहे. यासाठी नावनोंदणी आवश्यक असून दि. २२ जुन २०२४ पासुन नाव नोंदणी सुरु झाली आहे.
यासह डॉ. परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त ९ जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी रुग्णांनी या विशेष सवलती दराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे
0 Comments