google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..'भाड्याने रहायला कोणत्या घरात जायचे?' किरकोळ वादातून घडलं भयंकर; डोक्यात खोरे घालून पतीने पत्नीला संपवलं सांगली जिल्ह्यातील घटना...

Breaking News

खळबळजनक..'भाड्याने रहायला कोणत्या घरात जायचे?' किरकोळ वादातून घडलं भयंकर; डोक्यात खोरे घालून पतीने पत्नीला संपवलं सांगली जिल्ह्यातील घटना...

खळबळजनक..'भाड्याने रहायला कोणत्या घरात जायचे?' किरकोळ वादातून घडलं भयंकर;


डोक्यात खोरे घालून पतीने पत्नीला संपवलं सांगली जिल्ह्यातील घटना...

विटा : भाड्याची खोली बदलण्यावरून झालेल्या वादातून रागाच्या भरात पतीने पत्नीच्या डोक्यात खोरे घालून खून केल्याची घटना विट्यात घडली. 

सलमा गुराप्पा इकुरोट्टी (वय २८, रा. खानापूर नाका, विटा) असे मृत महिलेचे नाव आहे.

ही घटना बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी पोलिस महेश अरूण संकपाळ यांनी फिर्याद दिली आहे. 

संशयित आरोपी गुराप्पा शंकराप्पा इकुरोट्टी (वय ३०, रा. सध्या विटा, मूळ गाव याडहळ्ळी ता. शोरपुरा जि. यादगीर, कर्नाटक) याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, येथील विजय उथळे यांची विट्याच्या खानापूर नाका येथे एक खोली आहे. या खोलीत मूळचे कर्नाटक राज्यातील यादगिरी 

जिल्ह्यातील एक कुटुंब काही महिन्यांपासून वास्तव्यास होते. गुराप्पा इकुरोट्टी आणि पत्नी सलमा अशी या पती-पत्नीचे नाव. हे दाम्पत्य विजय उथळे यांच्या खोलीत भाड्याने राहत होते.

 मोलमजूरी करून ते आपला उदरनिर्वाह करत. त्यांच्यात वारंवार किरकोळ कारणावरून नेहमी वाद होत होता. बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून त्यांच्यात सध्या राहत असलेली 

भाड्याची खोली बदलून दुसरीकडे जायचे, या कारणावरून वादावादी सुरू होती. या दरम्यान रागाच्या भरात गुराप्पा याने घरातील खोऱ्याने पत्नी सलमाच्या डोक्यात वार केला. यामध्ये सलमा जागीच ठार झाली.

पतीला अटक 

विट्यात मजुरी करून गुजराण करणाऱ्या या कुटुंबातील खुनाच्या प्रकाराने परिसरात खळबळ माजली आहे. 

घटनेची माहिती समजताच रात्री उशिरा बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. संशयित गुराप्पा इकुरोट्टी याला विटा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

 घटनेची माहिती मिळताच पोलीस उप अधीक्षक विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक शरद मेमाणे तसेच पोलीस उपनिरीक्षक पुजा महाजन यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

पंचनामा करून महिलेचा मृतदेह शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. मृत सलमाच्या मोबाईल मधील माहिती घेऊन या घटनेची माहिती पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना कळवली.

Post a Comment

0 Comments