मोठी बातमी...बारामती येथील जनसन्मान महा मेळाव्यासाठी
सोलापूर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते जाणार ; जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील.
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला ; तालुका प्रतिनिधी राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी
रविवार दि १४ रोजी बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनसन्मान महामेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्याला सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून हजारो
कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. बारामती येथील पक्षाच्या जनसन्मान महामेळाव्याचे नियोजन करण्यासाठी सोमवार दि १३ रोजी पंढरपूर येथे पदाधिकारी
आणि कार्यकर्त्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवून आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी रविवार १४ रोजी राज्याचे
लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी
तसेच पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बारामती येथील मिशन हायस्कूल मैदानावर दु १.०० वा पक्षाचा हा जनसन्मान महामेळावा संपन्न होणार आहे.
या मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आणि शहराच्या ठिकाणाहून जास्तीत जास्त कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत
रविवार १४ रोजी होणाऱ्या पक्षाच्या जनसन्मान महामेळाव्याचे नियोजन करण्यासाठी आणि सोलापूर जिल्ह्यातील पक्षाच्या अन्य महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा
करण्यासाठी शनिवार १३ रोजी पंढरपूर येथील मार्केट यार्ड समोरील जोगेश्वरी हॉल येथे स. ११ वा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीत पक्षाच्या माध्यमातून तालुका निहाय किती नवीन मतदार नोंदणी करण्यात आली याचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
या योजनेची किती नाव नोंदणी झाली याबाबत आढावा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ देण्याबाबत चर्चा करण्यात येईल.
बारामती येथे रविवार दि १४ रोजी रोजी होणाऱ्या जनसन्मान महा मेळाव्यास सोलापूर जिल्ह्यातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच सर्व सेलच्या
पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.
कटफळ अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना आमदार शहाजीबापूंकडून प्रत्येकी ५० हजारांची मदत कटफळ अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना
आमदार शहाजीबापूंकडून प्रत्येकी ५० हजारांची मदत सांगोला (तालुका प्रतिनिधी): भरधाव वेगाने जाणाऱ्या मालट्रक चालकाने एसटीची वाट पाहत थांबलेल्या मजूर महिलांना चिरडल्याने
सांगोला तालुक्यातील कटफळ येथील सहा महिलांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांनी दुःख व्यक्त केले
असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत तसेच जखमी महिलेच्या उपचारासाठी २५ हजार रुपयांची व्यक्तिगत मदत जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून मृतांच्या नातेवाईकांना अधिकची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
मंगळवार १८ जून रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर- कराड रोडवरील चिकमहूद जवळ (बंडगरवाडी) पाटी येथे रोजंदारीने कामाला
जाणाऱ्या सहा मजूर महिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने कटफळ गावासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे. आश्विनी शंकर सोनार, इंदुबाई बा
सांगोल्यात महूद व हातीद अशा दोन नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती होणार - आमदार शहाजीबापू पाटील सांगोला (प्रतिनिधी): तालुक्यातील वाढती लोकसंख्या व वाढती गुन्हेगारी लक्षात घेता
सांगोला तालुक्यात एकच पोलीस स्टेशन असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच पोलिसांच्या कामकाजावरचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने
सांगोला पोलीस स्टेशन अंतर्गत महूद व हातीद येथे नवीन दोन पोलीस स्टेशनचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. लवकरच या दोन्ही पोलीस ठाण्याला मंजुरी मिळणार
असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. सांगोला तालुक्यातील वाढती लोकसंख्या व वाढती गुन्हेगारी लक्षात घेता
सांगोला तालुक्यात एकच पोलीस स्टेशन असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गेल्या वीस वर्षांपासून तालुक्यात नवीन दोन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्याची वारंवार मागणी केली जात होती.
मात्र, या मागणीकडे गेल्या वीस वर्षांत दुर्लक्ष झाल्याने नवीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव धूळखात पडला होता.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर आमदार शहाजीबापू पाटील यांनी या दोन नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीसाठी वारं
संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे महायुतीचे सरकार - आमदार शहाजीबापू पाटील शेतकऱ्यांनी ई-केवायसी अपडेट
करून दुष्काळ निधीचा लाभ घेण्याचे आवाहन सांगोला (प्रतिनिधी): खरीप हंगामात दुष्काळामुळे शेती पिकांचे नुकसान झाले
असून सांगोला तालुक्यातील १ लाख १९ हजार ३४२ बाधित शेतकऱ्यांना १५७ कोटी ०७ लाख ६७ हजाराचा मदत निधी प्राप्त झाला आहे.
सदरचा निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. शेतकऱ्यांनी आता ई केवायसी अपडेट करून संबधित तलाठ्याकडे सात बारा उतारा,
आठ अ उतारा, बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स प्रत, आधारकार्डची पूर्तता करून दुष्काळ निधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले आहे.
दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना हा मदत निधी उपलब्ध होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महायुतीचे सरकार सर्वसामान्यांचे
असून, त्यांच्या हिताचे निर्णय घेणारे आहे. संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे हे महायुतीचे सरकार आहे, असे मत आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.
0 Comments