google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील खळबळजनक घटना..ट्रॅव्हल्स मधून धाडसी चोरी; चोरट्याने पळवले 23 तोळे सोने;

Breaking News

सांगोला तालुक्यातील खळबळजनक घटना..ट्रॅव्हल्स मधून धाडसी चोरी; चोरट्याने पळवले 23 तोळे सोने;

सांगोला तालुक्यातील खळबळजनक घटना..ट्रॅव्हल्स मधून धाडसी चोरी; चोरट्याने पळवले 23 तोळे सोने


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- ट्रॅव्हल्स मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या पर्समधील साधारणपणे 23 तोळे व

 रोख रक्कम 39 हजार रुपये असा एकूण ८ लाख ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे.

सदरची चोरी दि. 09/07/2024 रोजीचे सायंकाळी 04/45 वा. ते दि. 10/07/2024 रोजीचे पहाटे 06/15 वा. चे दरम्यान नागपुर ते मौजे वाढेगाव ता. सांगोला

 चे दरम्यान झाली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी भेट दिली.

चोरीची फिर्याद बाबासाहेब नामदेव जाधव (वय 53 वर्षे, व्यवसाय- सोने चांदी व्यापार, रा. मायाक्का मंदिरजवळ वरची गल्ली,

 बायपास रोड, तासगाव ता. तासगाव जि. सांगली सध्या रा. खंडोबा मंदिराजवळ चांदणी चौक, सुभाष रोड, नागपुर यांनी

 सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे. पुढील तपास सपोनी मोरे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments