ब्रेकिंग न्यूज.. सांगोल्यात पंढरपूर ब्रीज कॉर्नरजवळ अपघात; एकाचा मृत्यू
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी):- ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक हयगयीने, निष्काळजीपणे, भरधाव वेगात
चालवून मोटारसायकलच्या समोरील बाजूस धडक दिल्याने मोटार सायकल स्वाराचा दुदैर्वी मृत्यू सांगोला ते वाढेगावकडे पंढरपूर ब्रीज कॉर्नरजवळ घडली.
अपघातामध्ये रमेश हजारे (वय 33 वर्षे रा.हजारेवाडी नंबर 2 वाढेगाव) यांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची फिर्याद सुरेश हजारे यांनी दिली आहे.
अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, दि. 23 जून रोजी सायंकाळी 7 वाजणेचे सुमारास रमेश नामदेव हजारे हे त्याच्या मोटार सायकलवरुन
सांगोला ते वाढेगावकडे पंढरपूर ब्रीजकडून चालवून मोटारसायकलीस समोरील बाजूस धडक दिल्याने मोटार
सायकलस्वार रमेश नामदेव हजारे याच्या डोक्यास व छातीस गंभीर मार लागुन मरणास कारणीभुत झाले
असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. व्हरे करीत आहेत.
0 Comments