मोठी बातमी..३० जून २०२४ अखेर पर्यंत नळधारकांनी मीटर दुरुस्त करावेत- डॉ. सुधीर गवळी
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
1106 नळधारकांकडून गैरप्रकार; १ जुलै पासून दुप्पटदराने पाणीपट्टी कराची आकारणी
सांगोला :- सांगोला नगरपरिषद हदिये क्षेत्रफल ६८.८२ चौ. कि.मी इतके असून यामध्ये सांगोला शहर व शहराबाहेरील १३ वाड्यावस्त्याच्या समावेश आहे.
इतक्या मोठ्या क्षेत्रफळाचे शहर असूनदेखील सांगोलानगरपरिषद मार्फत शहरात सुरळीतपणे पाणीपुरवठा केला जातो.
शहरात एकूण ६१८१ मीटर नळकनेक्शन बसवण्यात आले आहेत. सध्या मीटर रिडींगनुसार पाणीपट्टी कराची आकारणी केली जाते.
नगरपरिषदेमार्फत पाणीपट्टीची वसुलीची मोहिम हाती घेण्यात आलेले आहे. त्यामध्ये मीटर रिडींग घेण्या दरम्यान
नगरपरिषद कर्मचा- यांच्या असे निदर्शनास आले की, जवळपास 1106 नळधारकांचे मिटर बंद, मीटर, काढलेले, मीटर बुजलेले आणि रिडींग दिसत नाहीत इत्यादी गैरप्रकार करताना आढळून आले आहेत.
टाकीचे नाव:-) 1 पंढरपुररोड टाकी-77, 2) चिंदादेवी टाकी-39, 3) मिरजरोड टाकी-164, 4) वासुदरोड टाकी-202, 5) चिंचोलीरोड टाकी-85, 6) कोर्टरोड टाकी-152, 7) अंबिकादेवी टाकि - - 144, 8) एखतपुररोड टाकी- 141,9) काढलास रोड टाकी -102 एकूण -1106
त्यामुळे अचूक मीटर रिडींग घेवून पाणीपट्टी कराची आकारणी करण्यास अडचण येत आहे. तरी अशा नळधारकांनी ३० जून २०२४ अखेर पर्यंत आपले
मीटर दुरुस्त करून त्त्याबाबत नगरपरिषदेस अवगत करण्याचे आवाहन सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीरगवळी यांनी केले आहे.
ज्या नळधारकांना मीटर दुरुस्त करणे शक्य नसेल त्यांनी स्वखर्चाने नवीन नळकनेक्शन बसवावे. जे नळधारक याबाबत कार्यवाही करणार नाहीत
त्यांना १ जुलै पासून नगरपरिषदमार्फत दुप्पटदराने पाणीपट्टी कराची आकारणी केली जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सुधीर गवळी यानी केले आहे.
0 Comments