प्रा.लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनास कोळे ग्रामस्थांचा पाठींबा,गाव बंद ठेवून एक दिवसीय लक्षणिक उपोषण .
कोळे / प्रतिनीधी :- मराठा आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणामध्ये कोणताही बदल अथवा तडजोड केली जाणार नाही.
या प्रमुख मागणीसाठी गेल्या सात दिवसापासून जालना येथील ओबीसी कार्यकर्त्यांकडून आमरण उपोषण सुरू आहे.
प्रा. लक्ष्मण हाके उपोषणाचा सातव्या दिवसा अखेर महाराष्ट्र राज्य सरकारकडून ओबीसींच्या मागण्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
ओबीसी समाजाचे न्याय व हक्कांसाठी सर्व कार्यकर्ते व प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे १३ जून २०२४ पासुन जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावात आमरण उपोषण करीत आहेत.
या लक्ष्मण हाके यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी कोळे येथे गाव बंद ठेवून अर्जुन चौक इथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
यावेळी सर्व अत्यावश्यक सेवा वगळून सर्व कोळे गाव बंद ठेवून सर्व स्तरांतून पाठिंबा देण्यात आला. यावेळी श्रीमंत सरगर,देवा माने,
निलेश मदने, शिवा आलदर, रावसाहेब आलदर, किरण पांढरे,काशिनाथ आलदर, दत्ता सरगर,अशोक आलदर,हरी सरगर अदी सर्व ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments