google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक खून...सोलापुरात ' आप्पा 'कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

Breaking News

खळबळजनक खून...सोलापुरात ' आप्पा 'कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

खळबळजनक खून...सोलापुरात ' आप्पा 'कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक.. 


शहरातील उत्तर कसबा मधील पत्रा तालीम भागातील  आप्पा उर्फ खंडू बन्ने यांच्या वर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती,

 डॉक्टरांनी अखेरपर्यंत त्यांना वाचण्याचा प्रयत्न केला परंतु जबर झालेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.

यात हकीकत अशी की, 21 जून 2024 रोजी दुपारी 12.30 वा. चे सुमारास मौजे बाळे ता. उत्तर सोलापूर येथील गट नं.41/3 या शेता मध्ये शासकिय मोजणी करीत असताना शांतप्पा आडके, सागर आडके, बाळु आडके यांनी त्याचा राग मनात धरुन ही शेती

 आमची आहे, मोजणी करायची नाही, नाहीतर एकेकाला सोडणार नाही, या हरामखोरांना संपवु असे म्हणुन शांतप्पा आडके, सागर शांतप्पा आडके, 

बाळु आडके सर्व राहणार देगांव, ता. उत्तर सोलापूर व त्यांचे सोबतचे अनोळखी इतर 7 ते 8 इसम असे सर्वांनी एकत्रीत येवुन त्यांचे हातातील लोखंडी कोयता, लोखंडी पाईपने भाऊ पुरुषोत्तम याचे डोकिस, 

दोन्ही हाता-पायावर, कमरेवर, शरीरावर वार करुन त्यास गंभीर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मला लोखंडी पाईपने उजव्या खांद्यावर तसेच डाव्या पायाचे पिंडरीवर मारहाण करुन जखमी केले

 म्हणुन माझी शांतप्पा आडके, सागर आडके, बाळु आडके सर्व राहणार देगांव, ता. उत्तर सोलापूर व त्यांचे सोबतचे अनोळखी इतर 7 ते 8 इसम यांचे विरुध्द तक्रार दिली आहे.

गंभीर जखमी असलेले आप्पा उर्फ खंडू बन्ने यांचा या झालेल्या मारहाणीत अखेर मृत्यू झाला. त्यांच्या भावांनी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून 307 आता 302 मध्ये बदल होणार यातील

 एक आरोपला पकडण्यात पोलिसांना यश आले असून इतर आरोपी मात्र अद्याप फरार आहेत. पुढील तपास सपोनि गायकवाड फौजदार चावडी पोलिस स्टेशन हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments