मोठी बातमी... इचलकरंजीत महिलेचा खून, शिवाजीनगर पोलिसांनी फरार आरोपी पतीच्या आवळल्या मुसक्या,
शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संभाजी पुरीगोसावी (कोल्हापूर जिल्हा) प्रतिनिधी. इचलकरंजीत संग्राम चौकात तरुण विवाहितेचा
खून झाल्याचा प्रकार सायंकाळी उघडकीस आला आहे, पतीनेच गळा आवळून खून केल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे, याबाबत शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत,
यामध्ये करिष्मा किसन गोसावी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे, तर घटनेनंतर पती किसन गोसावी हा फरार झाला होता,
पण भिवंडी येथून शिवाजीनगर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत, याबाबत पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरून करिष्मा आणि किसन गोसावी हे उभयता गेले काही दिवसांपासून वरुटे इमारत येथे भाड्याने राहत होते,
आरोपी पती किसन गोसावी हा भंगार गोळा करण्याचे काम करत होता, पती-पत्नीमध्ये अलीकडे सातत्यांने खटके उडवत होते, काल सायंकाळपासून करिष्मा कुठे दिसत नव्हती,
त्यामुळे तिची दोन मुले मैत्रिणीकडे गेली होती, मैत्रीण कालपासून का दिसत नाही म्हणून शोध घेण्यासाठी ती करिष्मा च्या घरी गेली असता, तिने खिडकीतून डोकवून पाहिले असता करिष्मा ही मृत अवस्थेत दिसून आली,
याबाबतची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तासीलदार यांना दिल्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यासमवेत मिळत घटनास्थळी भेट दिली,
मारहाण करून पाय बांधलेल्या आणि चेहरा कांळवडलेल्या अवस्थेत करिष्माचा मृतदेह दिसून आला, तिचा गळा आवळून खून केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले
दरम्यान आरोपी पती किसन गोसावी हा घटनेनंतर फरार झाला होता, मात्र शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी किसन गोसावी यांच्या ठाणे भिवंडी येथून मुसक्या आवळल्या आहेत,*
0 Comments