google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सावधान ! मोबाइल बंद पडताच बँक खात्यातून दोन लाख काढून माल वाहतूकदाराला गंडा; फसवणुकीची नवी शक्कल सांगोला तालुक्यातील घटना...

Breaking News

सावधान ! मोबाइल बंद पडताच बँक खात्यातून दोन लाख काढून माल वाहतूकदाराला गंडा; फसवणुकीची नवी शक्कल सांगोला तालुक्यातील घटना...

 सावधान ! मोबाइल बंद पडताच बँक खात्यातून


दोन लाख काढून माल वाहतूकदाराला


गंडा; फसवणुकीची नवी शक्कल सांगोला तालुक्यातील घटना...

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

मोबाइल बंद पडला आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाच्या बँक खात्यातून २ लाख ११ हजार ८३० रुपये परस्पर काढून घेऊन गंडा घातला.

याबाबत, संपतराव बाबा कोळेकर (रा.कोळे कोंबडवाडी, ता.सांगोला) यांनी सांगोला पोलिसांत फिर्याद दिली आहे. हा प्रकार २५ आणि २६ मे रोजी घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संपतराव कोळेकर यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यांचे कोळे येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत खाते आहे. त्यांच्या बँक खात्यावर ट्रान्सपोर्ट गाड्यांच्या भाड्यासह अॅडव्हान्स रक्कम जमा होते.

दरम्यान, २१ मे २०२४ रोजी कोळेकर यांचा अचानक बंद पडलेला मोबाइल प्रयत्न करूनही चालू होत नव्हता. त्यांनी दुसरे सीमकार्ड घेऊन मोबाइल सुरू करण्याचा प्रयत्न केला. तरीही तो सुरू झाला नाही.

त्यांनी शिक्षक भाऊ तानाजी कोळेकर यांच्या मोबाईल वरून कस्टमर केअरशी संपर्क साधून संपत कोळेकर यांचा मोबाइल बंद असल्याबाबत तक्रार केली. त्यानंतर रात्री त्यांचा मोबाइल सुरू झाला.

दरम्यान, २६ मे रोजी फिर्यादी कोळेकर यांना विमा कंपनीस धनादेश द्यायचा असल्याने त्यांनी त्यांच्या खात्यावरील बॅलन्स तपासला असता खात्यावर फक्त २२ रुपये शिल्लक होते.

त्यांनी तत्काळ कोळे येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत जाऊन चौकशी केली असता २१ मे रोजी त्यांच्या खात्यावर २ लाख ११ हजार ८५२ रुपये होते,

मात्र २२ मे रोजी मोबाइल बंद पडल्यानंतर ११ रुपये दोन वेळा कट झाले तर २३ मे रोजी १ लाख ९० हजार रुपये तसेच २४ व २५ मे रोजी उर्वरित रक्कम कट झाली. अशाप्रकारे फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

Post a Comment

0 Comments