google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..आषाढी यात्रा सोहळा; पालखी, दिंडीधारकांनी आगाऊ प्लॉटसची मागणी नोंदवावी; भक्तीसागर येथे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य राहील

Breaking News

मोठी बातमी..आषाढी यात्रा सोहळा; पालखी, दिंडीधारकांनी आगाऊ प्लॉटसची मागणी नोंदवावी; भक्तीसागर येथे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य राहील

मोठी बातमी..आषाढी यात्रा सोहळा;  पालखी, दिंडीधारकांनी आगाऊ प्लॉटसची मागणी नोंदवावी; भक्तीसागर येथे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य राहील 


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

पंढरपूर :-  आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा दि. 17 जुलै रोजी साजरा होत आहे. या निमित्ताने जिल्हा प्रशासन नियोजनाच्या बैठक घेत कामाला लागले आहे. 

आषाढी यात्रेत येणार्‍या शेकडो दिंड्यांना वास्तव्यासाठी भक्तीसागर (65 एकर) येथे जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या ठिकाणी 497 मोफत प्लॉटस भाविकांना तंबू, 

राहुट्या उभारुन वास्तव्य करण्यासाठी देण्यात येत आहेत. प्रथम येणार्‍या पालखी, दिंडी धारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

चैत्री, कार्तिकी,आषाढी, माघी या वर्षभरातील महत्वाच्या चार यात्रांना लाखोंच्या संख्येने भाविक येतात. आषाढी यात्रा ही सर्वात मोठी यात्रा असते. या यात्रेला शेकडो संतांच्या पालख्या मजल दरमजल करत पंढरपूरला येतात.

 सद्याआषाढी यात्रा सोहळ्यासाठी  अनेक संतांच्या पालख्या, दिंड्यांचे प्रस्थान झाले आहे तर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या पालख्यांच्या प्रस्थान होणार आहे. 

या यात्रेला किमान 12 ते 15 लाख भाविक येतात. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासन भाविकांना सेवा सुविधा देण्यासाठी सज्ज असते. यात्रेच्या अगोदरच पुर्वतयारी सुरु करण्यात आलेली आहे.

आषाढी यात्रेला येणार्‍या पालख्या, दिंड्यांमधील भाविकांच्या निवाऱ्याची सोय भक्तीसागर (65 एकर) येथे करण्यात आलेली आहे. 

या ठिकाणी भाविकांना निवाऱ्यासोबत पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालय, वीज कनेक्शन, अन्नपदार्थ शिजवण्यासाठी गॅस वितरण, पोलीस संरक्षण, प्रथमोपचार केंद्र आदी सुविधा या ठिकाणी  दिल्या जातात.

 त्यामुळे या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी होते. या ठिकाणी एकूण 497 प्लॉट्स  असून त्यापैकी वापरायोग्य 492 प्लॉटस आहेत. 

हे प्लॉटस भाविकांना निवाऱ्यासाठी दिले जातात. या ठिकाणी भाविकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपत्‍कालीन मदत केंद्र स्थापन करण्यात येते.

 येथे प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज व सुरळीतपणे काम करण्यासाठी त्या ठिकाणी  जबाबदार अधिकारी म्हणून वर्ग -1 चे अधिकारी (सचिन मुळीक तहसिलदार मोहोळ) यांची सेक्टर मॅनेजर म्हणून म्हणून नियुक्ती केली आहे.

भाविकांना प्लॉटस वाटप करणे, अडीअडचणी सोडवणे, आपत्कालीन प्रतिसाद केंद्र व त्यावर नियुक्त सेक्टर मॅनेजर  व त्याचे अधिनस्त कर्मचारी कार्यान्वित असणार आहेत.

दिंडी, पालखी समवेत येणाऱ् भाविकांना भक्तीसागर 65 एकर येथे प्लॉटसचे वाटप करण्यात येणार आहे.

 आषाढी एकदशीच्या सोहळ्या अगोदर दिंडी, पालखीतील भाविकांने प्लॉटसाठी मागणी करणे आवश्यक आहे. 

त्यामुळे प्रथम येणाऱ्या भाविकास प्राधान्य देण्यात येणार आहे. या ठिकाणी भाविकांना मुलभूत सेवासुविधा पुरवण्यात येणार असून आपत्कालीन प्रतिसाद केंद्रातून भाविकांना सेवा देण्यात येणार आहे. 

यासाठी नायब तहसिलदार सुधाकर धाईंजे  (मो.क्र.9767248210), नायब तहसिलदार प्रविणकुमार वराडे (मो.क्र.9404983046)  यांच्याकडे संपर्क साधावा. असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments