google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पंढरपूर रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ भरधाव वाहनाच्या धडकेत उद्योजक जागीच मृत्यू;

Breaking News

सांगोला पंढरपूर रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ भरधाव वाहनाच्या धडकेत उद्योजक जागीच मृत्यू;

सांगोला पंढरपूर रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ  भरधाव वाहनाच्या धडकेत उद्योजक  सुहास ताड यांचा जागीच मृत्यू;


सांगोला-पंढरपूर रोडवर आज जागतिक सायकल दिना दिवशीच घडली दुर्दैवी घटना 

मंगळवेढा शहरातील एका प्रसिद्ध उद्योजकाला अज्ञात भरधाव येणाऱ्या वाहनाने जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना

 आज पहाटे 5 ते 6च्या सुमारास सांगोला पंढरपूर रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ घडली आहे.

सुहास शशिकांत ताड (वय 46 रा.खोमनाळ रोड) असे मयत झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. या घटनेची खबर सांगोला पोलीस ठाण्यात सुधीर ताड यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुहास ताड हे दररोज पहाटेच्या वेळी मंगळवेढा-सांगोला सायकलिंग करत होते. ते नेहमी प्रमाणे आज पहाटे सायकलिंग करत सांगोला येथे गेले होते.

सांगोला येथून पंढरपूर रोडच्या दिशेने जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या सायकलीला जोराची धडक दिली आहे.

सुहास ताड हे अतिशय शांत संयमी उद्योजक होते, त्यांच्या जाण्याने मंगळवेढा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

अतिशय दुर्दैवी घटना

अज्ञात वाहनाने मंगळवेढा येथील व्यापारी सुहास ताड या सायकल स्वारास धडक देऊन घटनास्थळी न थांबता वाहनासहित पसार झाला आहे. 

सांगोला पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सदरील घटना घडली असल्याने सांगोला पोलीस स्टेशनने या अज्ञात वाहनधारकाचा तपास करावा

 अशी मागणी सांगोला सायकलर्स क्लब सांगोला यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments