अतिशय धक्कादायक.. एकाच महिलेवर 4 वेगवेगळ्या ठिकाणी चौघांकडून अत्याचार; कोल्हापूरला हादरणारी घटना
कोल्हापूर : देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. कोल्हापूरमधून एक
अतिशय धक्कादायक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. यात एका महिलेसोबत चार जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केले.
ही धक्कादायक घटना यळगुड येथून समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांच्या मुसक्या आवळल्या असून प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या चौघांनीही धमकी देत महिलेवर अत्याचार केला होता. त्यांनी महिलेची माहिती एकमेकांना दिली.
यानंतर तिला धमकी देत चौघांनीही तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केले. या प्रकरणात तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्याचं समोर आलं आहे.
मुंबईत महिला पोलिसावर अत्याचार
दुसऱ्या एका घटनेत मुंबईच्या पंतनगर पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या एका विवाहित महिलेवर त्याच ठिकाणी काम करणाऱ्या पोलिसाने शारिरीक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. या घटनेनंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पंतनगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या 32 वर्षीय पोलिसाने त्याच ठिकाणी काम करणाऱ्या विवाहित महिला
कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवलं. प्रेमसबंध जुळवून नवी मुंबईतील सानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रूमवर नेऊन
तब्बल 2 वर्ष शारीरिक संबंध ठेवून तिच्याकडून खोटे सांगून 19 लाख रुपये उकळले. आरोपी पोलिसाने तिला नवरा सोडून देण्यास सांगितले. तसे न केल्यास मारून टाकण्याची धमकी दिली.
0 Comments