google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आनंदाची बातमी! राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक, कलावंतांच्या मानधनात 'इतकी' झाली वाढ; सोलापूर जिल्ह्यातील 'या' लाभार्थ्यांना होणार लाभ

Breaking News

आनंदाची बातमी! राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक, कलावंतांच्या मानधनात 'इतकी' झाली वाढ; सोलापूर जिल्ह्यातील 'या' लाभार्थ्यांना होणार लाभ

आनंदाची बातमी! राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक,


कलावंतांच्या मानधनात 'इतकी' झाली वाढ; सोलापूर जिल्ह्यातील 'या' लाभार्थ्यांना होणार लाभ 

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक, कलावंत मानधन योजना राबविली जाते.

 या योजनेअंतर्गत ज्येष्ठ साहित्यिक व लोक कलावंतांना दर महिन्याला २ हजार २५० रूपये मानधन दिले जात होते.

या मानधनात शासनाच्या वतीने वाढ करण्यात आली आहे. आता या योजनेअंतर्गत सर्व ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांना दर महिन्याला

 सरसकट प्रत्येकी ५ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. वाढीव मानधनाचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील १ हजार ८२ वृद्ध कलावंतांना होणार आहे.

१९५४-५५ या वर्षापासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ आता डीबीटी पद्धतीने देण्यात येणार आहे.

यासाठी जिल्हा परिषद, समाज कल्याण विभागाच्या वतीने लाभार्थ्यांचे आधार कार्ड संकलनाचे काम चालू आहे.

सोलापूर जिल्ह्यातील १ हजार ८२ लाभार्थ्यांपैकी ५११ कलाकारांचे आधार कार्ड संकलित करण्यात आले असून, उर्वरित पात्र लाभार्थी कलाकारांचे आधार कार्ड संकलनासाठी तालुका पातळीवर कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे.

तरी या कॅम्पमध्ये लाभार्थी कलाकारांनी आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments