कटफळ ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सुवर्णा हाके यांची बिनविरोध निवड कटफळ ग्रामपंचायतीवर आ.शहाजीबापू पाटील गटाचा झेंडा
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (तालुका प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील कटफळ ग्रामपंचायतीचे सरपंच विजय खरात यांनी राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी सरपंचपदाची निवड झाली.
या निवडणुकीत आमदार शहाजीबापू गटाच्या सुवर्णा परमेश्वर हाके यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली.
निवडीनंतर आमदार शहाजीबापू गटाच्या कार्यकर्त्यांसह समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.
कटफळ ता.सांगोला ग्रामपंचायतीचे सरपंच विजय खरात यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर मंगळवारी निवडणुक घेण्यात आली. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून बुरूंगले यांनी काम पाहिले.
सरपंच पदाच्या निवडणुकीत आमदार शहाजीबापू गटाकडून सुवर्णा परमेश्वर हाके यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता.
सरपंच पदासाठी सुवर्णा हाके यांचा एकमेव उमेदवारी अर्ज केल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कटफळ ग्रामपंचायतीवर आमदार शहाजीबापू पाटील गटाने झेंडा फडकवला आहे. नूतन सरपंचपदी सुवर्णा हाके यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.
यावेळी उपसरपंच शहाजी खरात, माजी सरपंच दत्तात्रय बंडगर, अंबादास हांडे, रघुनाथ खरात, दत्तू कारंडे, माजी सरपंच शिवाजी खरात,
माजी सरपंच अजित भिंगे, रघुनाथ तरंगे, लहानू वाघमोडे, हरिदास बंडगर, जेजीनाथ धंगेकर, ग्रामपंचायत सदस्य किसन धांडोरे, विजय खरात,
जनाबाई चव्हाण, मंदाबाई शेळके, शोभा दुधाळ, नारायण बंडगर, कारंडे, सावंत, ग्रामसेवक बुरुंगले पोलीस पाटील, पोलीस अधिकारी- कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments