google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी ! मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची मदत आता थेट मिळणार, मुंबईतील मंत्रालयात जाण्याची गरज नाही; 'या' नंबरवर करा संपर्क

Breaking News

मोठी बातमी ! मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची मदत आता थेट मिळणार, मुंबईतील मंत्रालयात जाण्याची गरज नाही; 'या' नंबरवर करा संपर्क

मोठी बातमी ! मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची मदत आता थेट मिळणार, मुंबईतील मंत्रालयात जाण्याची गरज नाही; 'या' नंबरवर करा संपर्क 


मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेच्या मदतीचा २५० कोटींचा टप्पा पार करीत ३० हजार पेक्षा जास्त रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. 

मागील १ वर्ष १० महिन्यात ३०,८३४ गरजू रुग्णांना एकूण २५५ कोटी ५४ लक्ष रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे.

 तर दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले आहे.

तर आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मुंबईत मंत्रालयात जाण्याची ही गरज नाही असेही चिवटे यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना चिवटे म्हणाले की, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या योजनेमुळे अनेक रुग्णांना 

अक्षरशः जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे संवेदनशील

 मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी देखील केले आहे.गोरगरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. 

या योजनेसाठी मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.

या नंबरवर करा संपर्क

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मध्ये रुग्णालय अंगीकृत करण्याची आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मधून रुग्णांनी अर्थसहाय्य मिळविण्याची प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क राबवण्यात येते. 

यासाठी ८६५०५६७५६७ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळवा, आणि स्वतः अर्ज करा.

अनेक दुर्धर आजारांचा समावेश

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आली आहे.

यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी,डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया

सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे अशी माहिती चिवटे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments