google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा

Breaking News

नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा

नीरा उजवा कालवा फुटला अन् माढ्याचं राजकारण तापलं; मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर गटाचा फलटण कार्यालयावर मोर्चा


नीरा उजव्या कालव्यास फलटण तालुक्यातील कोळंकी-जाधववाडी पाणीपुरवठा योजना टैंक पॉइंटजवळ गळती लागून पाणी हजारो लिटर वाया जाऊ लागल्याने प्रशासनाने उन्हाळी आवर्तन तात्पुरते 

थांबवून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे .मात्र, मतदान होऊनही अजूनही राजकारण संपले नसल्याचे चित्र माढा लोकसभेत पाहायला मिळत आहे . 

आज याच्या विरोधात मोहिते पाटील  आणि उत्तम जानकर  गटाने फलटण येथील नीरा कालवा विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा देत प्रशासनाला जाब विचारला आहे .

 विशेष म्हणजे याचे नेतृत्व भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी करीत उत्तम जानकर यांच्यासोबत फलटण कार्यालयावर धडक मारली . 

सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या धर्मपुरी येथे मोहिते पाटील आणि उत्तम जानकर समर्थक जमून नंतर वाहनाने हे सर्व आंदोलक फलटण येथील नीरा कालवा विभागाच्या कार्यालयावर पोहोचले. 

प्रशासनाच्या सांगण्यानुसार तेथील गळती दुरुस्तीसाठी नीरा उजवा कालव्यातून माळशिरस, सांगोला व पंढरपूर तालुक्यातील उन्हाळी आवर्तन बंद केले 

असून दुरुस्तीनंतर पुन्हा या भागातील शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे पाणी दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत होते . मात्र, तातडीने दुरूदती करून तातडीने पाणी देण्याची मागणी आंदोलकांची होती . 

नीरा उजवा कालवा कि.मी. 49/900 सेवा पथकाकडील बाजूस घळ पडून लागली होती . त्यामुळे पाणी वाया जाऊ लागल्याने हे आवर्तन थांबवल्याची प्रशासनाची भूमिका आहे . 

गळती लागल्याने कालवा विसर्ग कमी करून गळती रोखण्यास अंशतः यश आले होते. परंतु गळती पूर्णपणे रोखली गेली नाही. सध्या तीव्र दुष्काळाची स्थिती असल्याने

 पाण्याच्या आवर्तनात विस्कळीतपणा आल्यामुळे माळशिरस, सांगोला व पंढरपूर नीरा उजवा कालवा लाभधारक शेतकऱ्यांमधे असंतोष पसरला आहे. 

दोन दिवसांत पाणी सोडा अन्यथा धरणाचे दरवाजे उघडू: उत्तम जानकर

ऐन उन्हाळ्यात शेतातील उभी पिके व फळ पिके तसेच जनावरे, माणसांना पाण्याची नितांत गरज होती. अशावेळी उन्हाळी सिंचन आवर्तनादरम्यान गळतीची घटना घडल्याने चालू आवर्तनात खंड पडल्याने

 हजारो शेतकरी धास्तावले आहेत . याच शेतकऱ्यांचा आवाज मोहिते पाटील आणि जानकर यांनी धडक मोर्चाच्या रूपाने फलटण येथे नेला .

 येत्या दोन दिवसात दुरुस्ती करून आवर्तन सुरु करा अन्यथा धरणावर जाऊन दरवाजे उघडू, असा इशारा उत्तम जानकर यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे . 

एकंदर माढा लोकसभेची निवडणूक झाली असली तरी आज पुण्यात मतदान होत असताना या मोर्चाचा फायदा विरोधकांना मिळू शकणार आहे .

Post a Comment

0 Comments