मद्यप्रेमींसाठी महत्वाची बातमी ! तीन दिवस दारुची दुकानं राहणार बंद
तळीरामांसाठी महत्वाची अपडेट समोर येत आहे. या आठवड्याच्या शेवटी दारुचा थेंब काही तुमच्या घशाला शिवणार नाही.
राज्यात सलग तीन दिवस मद्यविक्री बंद आहे. शासनाने ड्राय डेची घोषणा केली आहे. त्यामागील कारणाचा तुम्हाला अंदाज आलाच असेल.
मद्यप्रेमींना या आठवड्याच्या अखेरीस पाण्यावरच तहान भागवावी लागेल. त्यांच्या घशाला दारुचा शेक बसणार नाही.
महाराष्ट्रात या आठवड्याच्या अखेरीस सलग तीन दिवस दारुची दुकानं बंद राहतील. राज्यात तीन दिवस ड्राय डे असेल.
या आठवड्यात शनिवारपासून ते पुढील आठवड्यातील सोमवारपर्यंत दारुची दुकानं बंद राहतील.
तरबेज मद्यप्रेमींनी त्यासाठीची तजवीज अगोदरच केली असेल. या कारणामुळे मद्यविक्री बंद असेल.
पाचव्या टप्प्यातील मतदान
लोकसभा निवडणूक 2024 मधील राज्यातील अखेरच्या टप्प्यातील, पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे.
या काळात मुंबईसह परिसरातील दारुची सर्व दुकाने, आस्थापना बंद असतील. प्रशासनाने 18 ते 20 मेपर्यंत ड्राय डे ची घोषणा केली आहे.
या काळात तळीरामांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याची अप्रत्यक्ष अपेक्षा आहे. तर कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
0 Comments