google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक ..पतीचा अपघातात मृत्यू, पत्नीने काही तासात संपवले आयुष्य

Breaking News

खळबळजनक ..पतीचा अपघातात मृत्यू, पत्नीने काही तासात संपवले आयुष्य

खळबळजनक ..पतीचा अपघातात मृत्यू, पत्नीने काही तासात संपवले आयुष्य


पतीचे अपघातात निधन झाल्याचे ऐकताच धक्का बसलेल्या पत्नीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

नांदेडच्या नायगाव तालुक्यात ही घटना घडली आहे. स्नेहा बेंद्रीकर असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे. 

त्यांच्या पतीचा काल रात्री घरी परतताना अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर रात्री उशिरा स्नेहानेसुद्धा आत्महत्या केली. स्नेहा यांचे पती अरुण बेंद्रिकर हे विष्णुपुरी येथून घरी परत येत होते. 

दरम्यान त्यांच्या बाईकला कहाळा-गडगा येथे अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अरुण यांचा मृत्यू झाला. अरुण यांचे अपघातात जागीच निधन झाल्यानंतर त्यांच्या खिशात असणाऱ्या

 ओळखपत्राच्या आधारे माहिती घेऊन स्नेहाला याबाबत सांगण्यात आले. स्नेहा यांना पती अरुण यांच्या निधनाची माहिती मिळताच जबर धक्का बसला.

 यातूनच त्यांनी रात्री उशिरा घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. स्नेहा यांचे पती अरुण हे महावितरणमध्ये कर्मचारी होते. त्या दोघांना अडीच वर्षांची मुलगीसुद्धा आहे.

Post a Comment

0 Comments