धक्कादायक ...कर्नाटकमध्ये भाजप नेत्याच्या मुलासह चौघांची हत्या
कर्नाटकातील गदग-बेतागेरी शहरात भाजप नेते आणि पालिकेचे उपनगराध्यक्ष सुनंदा बकाले यांच्या मुलासह चौघांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शुक्रवार, १९ एप्रिल रोजी हा प्रकार घडला. कार्तिक बकले, परशुराम हादिमानी आणि त्यांची पत्नी लक्ष्मी आणि त्यांची लहान मुलगी आकांक्षा अशी मृतांची नावे आहेत.
यातील कार्तिक हा सुनंदा बकाले यांचा मुलगा आहे. कार्तिकचे वडील प्रकाश बकाले हे सुद्धा पूर्वी पालिकेचे उपनगराध्यक्ष होते.
१७ एप्रिल रोजी कार्तिकचा साखरपुडा झाला होता. हादिमानी कुटुंबीय या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी कोप्पा येथून गदग बेतागेरी येथे आले होते. या चौघांची हत्या झोपेत असताना झाल्याचे आढळून आले.
या प्रकरणाबाबत बोलताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “मारेकरी पहिल्या मजल्यावरून खोलीत घुसले आणि परशुराम, लक्ष्मी आणि आकांक्षा यांची हत्या केली.
मोठा आवाज ऐकून कार्तिक पहिल्या मजल्यावर काय झाले हे पाहण्यासाठी गेला तेव्हा त्याचीही हत्या करण्यात आली.
0 Comments