google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज! गुढीपाडव्याच्या दिवशीच काँग्रेसला तगडा झटका

Breaking News

ब्रेकिंग न्यूज! गुढीपाडव्याच्या दिवशीच काँग्रेसला तगडा झटका

 ब्रेकिंग न्यूज! गुढीपाडव्याच्या दिवशीच काँग्रेसला तगडा झटका


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. राज्यात सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत पहावयास मिळत आहे.

 दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला पुन्हा धक्का बसला आहे. पक्षाची भूमिका माध्यमांकडे मांडणाऱ्या व्यक्तीनेच हा धक्का दिला आहे. काँग्रेस पक्षाची धडधडणारी तोफ शिंदे गटात गेली आहे. 

काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश झाल्यानंतर वाघमारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

वाघमारे म्हणाले की, आज गुढीपाडव्याचा मुहूर्तावर विजयाची गुढी मुख्यमंत्री ज्यांना आपण असे म्हणून सामान्य माणसांचा 

मुख्यमंत्री. जनतेचा मुख्यमंत्री. या महाराष्ट्राच्या विकासाचा मुख्यमंत्री जर कोण असेल तर ते आदरणीय एकनाथरावजी शिंदे. ज्या पद्धतीने शिंदे साहेबांनी जी कामगिरी केलेली आहे,

 महाराष्ट्राच्या इतिहासात नव्हे भारताच्या इतिहासात कमी वेळात जास्त काम कोणत्याच मुख्यमंत्र्याने केलेले नाही.

 हे सगळ्यांना मान्य करावे लागेल. वाघमारे पुढे म्हणाले की, काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाची एका प्रादेशिक पक्षाने केलेली ससेहोलपट बघता कार्यकर्ते व्यथित आहेत.

 पक्षातल्या काही स्वार्थी आणि गलिच्छ राजकारणाने मी त्रस्त होतो त्यामुळे मी शिंदे गटात प्रवेश केला आहे. महाराष्ट्रातील काही ठाराविक नेत्यांच्या हाताखाली काँग्रेस दबलेली आहे.

Post a Comment

0 Comments