शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या परीक्षा विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आल्याची घटना..
अभाविप कडून प्र. कुलगुरूंची भेट घेऊन विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा म्हणुन निवेदन
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या परीक्षा विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आल्याची घटना बघायला मिळत आहे.
बीकॉम विद्यार्थ्यांचा अॅडव्हान्स अकाउंटन्सी या विषयाच्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा ही नक्की कोणत्या कारणामुळे घेण्यात येणार आहे,
याबाबत साशंकता विद्यार्थ्यांच्या मध्ये आहे. बीकॉम ३ च्या ऍडव्हान्स अकाउंट या विषयाच्या पेपरमध्ये आऊट ऑफ अभ्यासक्रम प्रश्न विचारण्यात आले असून हे चुकीचे असल्याचे निदर्शनास येते.
या विषयात आज अभाविप कडून प्र. कुलगुरूंची भेट घेऊन विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा म्हणुन निवेदन देण्यात आले.
शिवाजी विद्यापीठ मार्च एप्रिल २०२४ सत्रातील b.com भाग ३, सत्र ६ च्या झालेल्या परीक्षेमध्ये (Advanced Accountancy Paper 3)
या विषयाचा पेपर सोमावर दिनांक ०१/०४/२०२४ रोजी सकाळी १०.३० ते १२.३० दरम्यान झाला.
या विषयाचा प्रश्नपत्रिके मध्ये Q.2.b) मध्ये परिक्षा विभागाकडून चूक झालेली असून . संबंधित विषयांची परिक्षा संलग्नित सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिलेली आहे.
पुन्हा एकदा शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षा विभागाचा भोंगळ कारभार समोर आलेला आहे.
विद्यापीठाच्या परिक्षा विभागाच्या चुकीमुळे या विषयाची पुनः श्च परिक्षा दिनांक १०/०४/२०२४ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.
केवळ विद्यापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांची पुनः श्च परीक्षा का ? हा सर्व विद्यार्थ्यांचा विद्यापीठाला प्रश्न आहे.
कोणत्याही प्रकारची पुनः श्च परिक्षा न घेता परिक्षा विभाकडून झालेल्या चुकीचे विद्यार्थ्यांना योग्य गुणदान करावे ही सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. या भोंगळ कारभाराचा विद्यार्थी निषेध व्यक्त करत आहेत ..
0 Comments