मोठी बातमी..रणजितसिंह मोहिते पाटील, आमदारकीचा राजीनामा तर द्या किंवा भाजपाचे काम करा -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सक्त इशारा
धैर्यशील मोहिते पाटलांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि आर्थिकदृष्ट्या ठपका ठेवलेला कारभार यामुळे विरोधी पक्षाला भक्कम मुद्दे आहेत. त्यामुळेच पवारसाहेब धैर्यशील यांना उमेदवारी देण्यासाठी नाखूश तर होतेच,
परंतु आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह शिवरत्नच्या सर्व सदस्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करावा
अशी शरद पवारांनी अट घातली आहे. मोहिते पाटलांचा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना वाढता
विरोध आणि त्यांची तुतारीकडील ओढ पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकीचा राजीनामा तर द्या, किंवा भाजपाचे काम करा असा सक्त इशारा दिला आहे.
कार्य आणि कर्तृत्वात शून्य असल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील पवारांच्या वेटींग लिस्टमध्ये चवथ्या स्थानावर होते. रासपाचे महादेव जानकर पवारांच्या लिस्टमध्ये एक
नंबरला, दोन नंबरला स्वर्गिय गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ अनिकेत देशमुख, तीन नंबरला संजीवराजे निंबाळकर आणि चार नंबरला धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव होते.
यादरम्यान संजीवराजे आणि धैर्यशील यांनी आपापसात चर्चा करून तुतारीवर कुणाला लढायचे? हे ठरवावे असे म्हणून शरद पवारांनी इथेही धैर्यशील यांना स्वत:ची जागा आणि स्थान दाखविले.
वास्तविक पाहता जयसिंह आणि धैर्यशील यांनी आजपर्यंत मतांच्या जोरावर ब्लॅकमेलिंगचेच राजकारण केले. या काका पुतण्यांनी फायदा तिथेच विकास केल्याचा इतिहास आहे.
जयसिंहांनी “बारामतीचा उमेदवार आम्ही पाडणार” असे वक्तव्य केल्याने हे वाक्य उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या खूपच जिव्हारी लागल्याने त्यांचे माढा लोकसभा मतदारसंघात खूपच लक्ष असल्याचे समजते.
आरएसएसच्या केडरबेस कार्यकर्त्यांच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार विद्यमान आमदार रणजितसिंहांना भाजपाच्या व्यासपीठावरून
खा रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा प्रचार भाजपाच्या स्टार प्रचारकांसमवेत करावा लागणार आहे.
मात्र धैर्यशील यांनी माढ्यातून लढण्यासाठी जोर लावला असून उमेदवारी मिळण्यापूर्वीच त्यांच्या समर्थकांकडून तुतारीचा जोरदार प्रचार सुरू आहे.
तरीही आमदार रणजितसिंह मोहिते पाटील त्यांना थांबवू शकत नसल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकीचा राजीनामा द्यायला लावल्याचे खात्रीशीर सूत्रांकडून समजते.
दरम्यान राजकीय स्वार्थापोटी धैर्यशील गोविंदबागेच्या पाणवठ्यावर गेल्यामुळे नाईलाजास्तव शरद पवारांनी त्यांना बुडत्या जहाज घेतले
तरी मोहिते पाटलांचे राजकीय अस्तित्व मातीमोल झाल्याशिवाय राहणार नाही असे राजकीय जाणकारांतून बोलले जात आहे.


0 Comments