खळबळजनक ...मामाला मारायला दहा जण आले अन् भाच्याचाच गेम केला, नाशिकमधील धक्कादायक घटना
नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आता पूर्ववैमनस्यातून मामाला मारण्यासाठी आलेल्या दोन जणांनी भाच्यालाच संपवल्याची धक्कादायक घटना
नाशिकमध्ये उघडकीस आली आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या कालिका मंदिरामागे असलेल्या सहवासनगरमध्ये दहा जणांच्या टोळक्याने एका वीस वर्षीय युवकाची धारधार शस्त्राने वार केले.
शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. या घटनेत पियुष भीमाशंकर जाधव हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
दहा जणांविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी दहा संशयित आरोपींविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील साहिल कृष्णा वांगडे,
नितीन शंकर दळवी, निलेश नायर आणि ऋषिकेश जोर्वेकर या चौघांना अटक करण्यात आली आहे. इतरांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
पूर्ववैमनस्यातून हत्या
विशेष म्हणजे पोलिसांनी आरोपींची चौकशी सुरू करताच मयत पियुषचा मामा यादव धर्मा लहांगे यास पूर्ववैमनस्यातून मारण्यासाठी हे सर्व हल्लेखोर गेले होते.
मात्र मामा न दिसल्याने त्यांनी भाच्याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले झाले आहे. नाशिकमधील वाढती गुन्हेगारी रोखणे हे नाशिक पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
0 Comments