खळबळजनक घटना..मतदान करायला आला अन् ईव्हीएमवर घातले कुऱ्हाडीचे घाव
देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहेत. विविध पक्षांकडून प्रचाराला जोर दिला जात आहे.
तसेच प्रचारातील रंगत आता वाढत आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान अलीकडेच पूर्ण झाले. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे.
या मतदानादरम्यान राज्यातील काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या.
त्यानंतर आता नांदेड मतदारसंघातील एका केंद्रात तरुणाने कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना घडली आहे.
या घटनेनंतर मतदान केंद्रावर खळबळ उडाली. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदान केंद्रावर ही घटना घडली. या तरुणाने कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडले.
भय्यासाहेब येडके असे तरुणाचे नाव आहे. यानंतर मतदान केंद्रावरील पोलिसांनी या तरुणाला तातडीने ताब्यात घेतले. या तरुणाने असे कृत्य का केले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
0 Comments