google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत जबरदस्तीने ठेवले शारीरिक संबंध, नंतर गर्भपातही केला; पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

Breaking News

खळबळजनक..पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत जबरदस्तीने ठेवले शारीरिक संबंध, नंतर गर्भपातही केला; पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

 खळबळजनक..पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत जबरदस्तीने ठेवले शारीरिक संबंध,


नंतर गर्भपातही केला; पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल 


पुणे : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची धक्कादायक घटना शिवाजीनगर परिसरात घडली आहे. 

यातून युवती गर्भवती राहिल्यानंतर तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एका पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण माणिक महामुनी (वय-38, रा. नागपुर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. 

याप्रकरणी 33 वर्षीय युवतीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर सदर हा प्रकार ऑगस्ट 2017 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत शिवाजीनगर गावठाण येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती पोलीस भरतीची तयारी करत होती. तेव्हा तिची आरोपी किरण महामुनी याच्यासोबत ओळख झाली. 

आरोपी हा पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. त्या दोघांमध्ये ओळखीतून मैत्री आणि मैत्रीतून प्रेमसंबंध तयार झाले.

 आरोपीने पीडितेला शिवाजीनगर गावठाण येथील एका घरी नेले. त्याठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून पीडिता गर्भवती राहिली.

दरम्यान, हा प्रकार समजल्यानंतर आरोपी किरण महामुनी याने पीडितेला जामखेड तालुक्यातील एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी तिचा जबरदस्तीने गर्भपात केला,

 अशी फिर्याद पीडितेने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार किरण महामुनी याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments