(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला/प्रतिनिधी - सांगोला नगरपरिषद सांगोला यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते रवि साबळे यांनी माहिती अधिकार अर्ज करून
सांगोला नगरपरिषदेचे एकूण विभाग व त्या विभागाचे जनमाहिती अधिकारी कोण आहेत. याची सविस्तर माहिती मागितली होती.
त्यावर नगरपरिषदेने एकूण दहा विभाग
असून त्या सर्व विभागाचे जनमाहिती अधिकारी यांची नावे व पदनाम याची सविस्तर माहिती साबळे यांना दिली.
ज्यामध्ये असे दिसून आले
की एका सफाई कर्मचारी असणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला जनमाहिती
अधिकारी म्हणून नियुक्त केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
माहिती आयोगाने यापूर्वी एका प्रकरणामध्ये स्पष्ट केले आहे की, माहिती अधिकार कायद्यात कर्मचारी हा शब्द नसून
अधिकारी हा शब्द नमूद आहे. त्यामुळे जनमाहिती अधिकारी हे वर्ग-1 किंवा वर्ग-2 चे अधिकारी असणे बंधनकारक आहे.
तसेच महाराष्ट्र शासनाने 1 फेब्रुवारी 2017 ला परिपत्रक काढून कामाचा पुरेसा
अनुभव व दर्जा असणाऱ्या योग्य वरिष्ठतेच्या अधिकाऱ्याची नेमणूक ही जनमाहिती अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात यावी असे आदेश दिले आहेत.
मात्र सांगोला नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी सफाई कर्मचारी असणाऱ्या
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला जनमाहिती अधिकारी म्हणून नियुक्त केले असल्याची घटना घडली आहे.
सदरची नियुक्ती रद्द होऊन त्याठिकाणी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे सांगण्यात आले.
0 Comments