ब्रेकिंग न्यूज...सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाला धक्का
सांगोल्यात आनंदा माने गटाचा लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश !
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : सांगोला शहरातील माजी नगरसेवक महायुतीचे गटनेते आनंदा माने यांच्या गटाने सांगोल्याचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात लवकरच
प्रवेश करणार असल्याचे आज झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले . या पत्रकार परिषदेस माजी नगराध्यक्षा सौ. राणीताई माने, माजी नगरसेवक आस्मीर तांबोळी,
ज्ञानेश्वर तेली, सोमनाथ गुळमिरे, माजी नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, सूर्यकांत मेटकरी,काशिलिंग गावडे, मेजर मेजर व्हटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
आनंदा माने गट यापुढे लोकसभा विधानसभा नगरपालिका यासह सर्वच निवडणुका आमदार ॲड.शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटाच्या वतीने लढणार
असल्याचे त्यांनी जाहीर केले.लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना सांगोला शहरातून मताधिक्य देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मागील लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची गेल्या वेळी त्यांनी सांगोला शहरात प्रचार यंत्रणा राबवून
त्यांच्या विजयात आनंदा माने गटाचा मोठा वाटा होता. सांगोला नगरपालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्षा सह पाच नगरसेवक आनंदा माने गटाचे होते,
सांगोल्याचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या विकास कामावर प्रभावित होवून विकासाचे राजकारण करायचे आहे,
म्हणून त्यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सांगोला शहरात यामुळे शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसला
असून दीड वर्षांपूर्वी आनंद माने गटाने पत्रकार परिषद घेऊन नगरपालिकेच्या निवडणुका शेतकरी कामगार पक्षा सोबत आघाडी करून लढणार असल्याचे जाहीर केले होते.
परंतु बदलती राजकीय परिस्थिती याचा विचार करून आनंदा माने यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून
काम करणार असल्याचे सांगितल्याने त्याचा निश्चितच मोठा फरक सांगोला शहरात पडेल असे मत राजकीय जाणकारातून व्यक्त केले जात आहे.
0 Comments