विठ्ठलवर फुलणार कमळ ; जप्ती होताच अभिजीत पाटील भाजपाच्या वळचनीला
अभिजीत पाटील यांचा शरद पवारांना धपका ? राष्ट्रवादीला सोडून पाटील भाजपच्या दारात जाण्याची शक्यता…
पंढरपूर :- पंढरपूर तालुक्याचे राजकारण हे माढा मतदार संघासोबत बदलण्याची चिन्हे आहेत.
कारण अभिजीत पाटील हे थेट शरद पवार यांची साथ सोडून भाजपाच्या वळचणीला जाण्याची शक्यता आहे. कराखान्यावर झालेल्या कारवाई नंतर पाटील हा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.
आज सकाळी पवार साहेब यांच्या सोबत विठ्ठल मंदिरात असणारे पाटील हे संध्याकाळी कमळ हाती घेण्याची शक्यता आहे. असे झाले तर निश्चितच महाविकास आघाडीला तसेच शरद पवार यांना मोठा धपका बसण्याची शक्यता आहे.
अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर नुकतीच राज्य सहकारी बँकेने कारवाई केली. त्यावेळी अभिजीत पाटील शरद पवार यांच्यासोबत करमाळ्याच्या सभेत होते.
या सभेतून अभिजीत पाटील यांनी वॉकआऊट करत थेट कारखाना गाठला. शुक्रवारी संध्याकाळी पंढरपुरातील शरद पवारांच्या सभेतही अभिजीत पाटील अस्वस्थ दिसले. केवळ पंढरपूरच्या विकासावर बोलते इतर कुठलेही
राजकीय भाषा अभिजीत पाटील यांनी यावेळी बोलली नाही. अशातच कारखान्याचे चेअरमन असणाऱ्या अभिजीत पाटील यांच्या संचालक मंडळाने आता त्यांना थेट भाजपामध्ये प्रवेश करू.
असा तगादा लावलाय. पाटील यांचा देखील छुपा राजकीय ओढा भाजपाकडे आहे. अशा स्थितीत पाटील हे शरद पवारांचा हात सोडू शकतात.
5 जून 2023 रोजी विठ्ठल कारखान्यावर झालेल्या कार्यक्रमात अभिजीत पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता.
यावेळी माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी थेट शरद पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीचा पंचा पाटील यांच्या गळ्यात घालून त्यांना पक्षात घेतले होते.
त्यामुळे पाटील यांची थेट राष्ट्रवादीत जाण्याची तत्कालीन स्थितीत मानसिकता नव्हती. असे बोलले जात होते. अशातच कारखान्याच्या कारवाईनंतर अभिजीत पाटील हे भाजपचे दार ठोठावत आहेत.
0 Comments