google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक.. अज्ञात कारणावरून एकाने ५५ ते ६० वयाच्या वृद्ध महिलेच्या गळ्यावर वार करून डोक्यात दगडाने ठेचून खून सांगोला तालुक्यातील घटना..

Breaking News

खळबळजनक.. अज्ञात कारणावरून एकाने ५५ ते ६० वयाच्या वृद्ध महिलेच्या गळ्यावर वार करून डोक्यात दगडाने ठेचून खून सांगोला तालुक्यातील घटना..

 खळबळजनक.. अज्ञात कारणावरून एकाने ५५ ते ६० वयाच्या वृद्ध महिलेच्या गळ्यावर वार


करून डोक्यात दगडाने ठेचून खून सांगोला तालुक्यातील घटना..

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२) 

सांगोला : अज्ञात कारणावरून एकाने ५५ ते ६० वयाच्या वृद्ध महिलेच्या गळ्यावर वार करून डोक्यात दगडाने ठेचून खून केला. 

ही घटना सोमवारी रात्री उशिरा शिरभावी (ता. सांगोला) येथील वन विभागाच्या कार्यक्षेत्रात उघडकीस आली आहे.

दरम्यान, सांगोला तालुक्यात पाचेगाव बुद्रुक येथील दाम्पत्याच्या खुनाची घटना १ मार्च रोजी उघडकीस आली होती. तोच आता शिरभावी येथे वृद्ध महिलेच्या खूनाच्या घटनेमुळे सांगोला तालुका हादरून गेला आहे. 

वनरक्षकाकडून माहिती मिळताच पोलीस पाटील सोमनाथ ढोले यांनी सदर घटनेची माहिती सांगोला पोलीस स्टेशनला दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून मंगळवेढा उपविभागीय 

पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक भीमराव खंणदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात, पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली असून मृत वृद्ध महिला कोणत्या गावातील आहे.

 याबाबतची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला आहे.

Post a Comment

0 Comments