google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यातील घटना ..बारावीचा पेपर अवघड गेल्याने तरूणीने संपविले जीवन

Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील घटना ..बारावीचा पेपर अवघड गेल्याने तरूणीने संपविले जीवन

सोलापूर जिल्ह्यातील घटना ..बारावीचा पेपर अवघड गेल्याने तरूणीने संपविले जीवन


धर्मपुरी (ता.माळशिरस) येथील तरूणीने बारावीचा पेपर अवघड गेल्याने गुरूवारी (दि.७) राहत्या घरी जीवन संपविले.

 किरण भाऊसो पाटोळे (वय १७) असे मृत तरूणीचे नाव आहे.ती नातेपुते येथील डॉ बाळकृष्ण दाते प्रशाला येथे किरण विज्ञान शाखेत शिकत होती.

किरण बारावीचे पेपर अवघड गेल्याने नाराज होती. गुरूवारी सायंकाळी सातच्या सुमारास ती भावंडांबरोबर गप्पा मारून आपल्या खोलीत गेली. 

बराच वेळ झाला ती खोलीबाहेर आली नसल्याने आईने तिच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. 

आतून काहीच प्रतिसाद न आल्याने आईने कुटुंबातील लोकांना याची माहिती दिली. कुटुंबियांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला

 असता तिने जीवन संपविल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी घेत

 मृतदेह शवविच्छेदनासाठी नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याबाबत अधिक तपास नातेपुते

 पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.को जावेद जमादार करत आहेत.

Post a Comment

0 Comments