google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक...माझ्याबद्दल आबासाहेबांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध राहणार- डॉ. अनिकेत देशमुख चिखलफेक करणाऱ्यांना डॉ. अनिकेत देशमुखांचे व्हिडिओद्वारे सडेतोड उत्तर

Breaking News

खळबळजनक...माझ्याबद्दल आबासाहेबांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध राहणार- डॉ. अनिकेत देशमुख चिखलफेक करणाऱ्यांना डॉ. अनिकेत देशमुखांचे व्हिडिओद्वारे सडेतोड उत्तर

खळबळजनक...माझ्याबद्दल आबासाहेबांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध राहणार-


डॉ. अनिकेत देशमुख चिखलफेक करणाऱ्यांना डॉ. अनिकेत देशमुखांचे व्हिडिओद्वारे सडेतोड उत्तर

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (तालुका प्रतिनिधी): आबासाहेबांनी गेल्या ५० वर्षापासून जोपासलेला समाजसेवेचा वसा मी जपण्याचा प्रयत्न करत आहे. 

सांगोल्यातील जनतेसाठी मी अहोरात्र कटीबद्ध राहीन. राजकीय संघर्ष माझ्यासाठी नवीन नसून लोकांमध्ये माझ्याविषयी चुकीची इमेज तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

 काही आपलीच, माझ्या जवळची लोकं। माझ्याबाबत बोलतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे. माझ्याबद्दल आबासाहेबांनी बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कटीबद्ध राहीन.

 लोकांमध्ये माझी चुकीची इमेज तयार करणाऱ्या उत्तर देण्यासाठी व्हिडिओ बनवायची वेळ आली हे दुर्दैव असल्याचे सांगत शेकापचे युवा नेते डॉ.अनिकेत देशमुख यांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली.

 चिखलफेक करणाऱ्यांना व्हिडिओद्वारे सडेतोड उत्तर देत डॉ.अनिकेत देशमुख यांनी शेकापच्या ध्येयधोरणानुसार काम करण्याचा सल्ला दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेकापमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. शेकापचे युवा नेते डॉ. अनिकेत देशमुख यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून शेकापमध्ये पक्षांतर्गत चाललेल्या काही गोष्टींचा उलगडा केला. 

माझ्यावर चिखलफेक होत असल्याने स्पष्टीकरण देण्याची गरज असल्याचे डॉ. अनिकेत देशमुख यांनी व्हिडिओद्वारे सांगत स्वतः वर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली.

 विकास करण्यासाठी काम करावे लागते. लोकांसमोर बोलावे लागते, तहसीलदारांना फक्त निवेदन देवून फोटो काढून चालत नाही. प्रत्येक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मी काम करीत असतो.

 मात्र, अशा पद्धतीने काम करीत असताना माझ्यावर चिखलफेक करण्याचे काम केले आहे. पक्ष माझा आहे असे मी कधीही सांगितले नाही. शेतकरी कामगार पक्षाला आबासाहेबांनी वेगळ्या टप्प्यावर नेवन ठेवले आहे. 

मी आजही पक्षाचा कार्यकर्ताम्हणून काम करत आहे.मी सातत्याने चिटणीसासोबत संवाद साधत होतो. मी एकटा ठस्वत नाही, आज मीटिंग घ्या, असा आदेश सोडत नाही. 

शेकापचे चिटणीस आणि सूत गिरणीचे चेअरमन हॉ. माळी यांनाही मीटिंग आहे हे माहीत नव्हतं. रातोरात फोन करून लोकांना वेठीस धरून बोलवायचं, त्यांना नाही ते बोलायचं.... अशा पद्धतीचे राजकारण सांगोला तालुका सहन करणार नाही.

 आपण कुठल्या दिशेने चाललो आहे, याचा शेतकरी कामगार पक्षाने विचार करावा शेतकरी कामगार पक्ष हा कष्टकरी, जनतेचा, शेतकऱ्यांचा पक्ष आहे.

 मी निवडणुकीनंतर शिक्षणासाठी गेल्याने एक वर्ष नव्हतो. आबासाहेबांनी गेल्या ५० वर्षापासून जोपासलेला समाजसेवेचा वसा मी जपण्याचा प्रयत्न करत आहे. मला कोण रसद पुरवतंय, घरातील कोणीतरी रसद पुरवतंय, अशातला भाग नाही. 

वयाच्या ३१ व्या वर्षी मी स्वतः कमवतो, स्वतःच्या हिमतीवर राजकारण करत आहे. माझ्यावर जी चिखलफेक करण्यात आली, त्याला या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देत असल्याचे डॉ.अनिकेत देशमुख यांनी स्पष्ट केले.

मी पक्षात गट तट मानत नसून आजही मी सर्वांशी प्रेमाने वागत असल्याने त्याच्या जोरावरच मी तग धरून आहे. माझ्याबद्दल आबासाहेबांनी बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कटीबद्ध राहीन.

 सांगोल्यातील जनतेसाठी मी अहोरात्र कटीबद्ध राहीन, मला व्हिडिओ बनवायची वेळ आली हे दुर्दैव आहे. काही आपलीच, माझ्या जवळची लोक माझ्याबाबत बोलतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे.

 मात्र, मी खचून जाणार नाही. संघर्ष माझ्यासाठी नवीन नाही. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मी, दादा आणि आई आम्ही सर्वजण यातून कसे वर आलो हे मला माहीत आहे. 

हा किरकोळ संघर्ष आहे. लोकांमध्ये माझी चुकीची इमेज तयार करताहेत त्यांच्यासाठी हे उत्तर असल्याचे डॉ.अनिकेत देशमुख यांनी व्हिडिओद्वारे सांगितले.

Post a Comment

0 Comments