google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक बातमी! मंगळवेढा तालुक्यातील कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

Breaking News

धक्कादायक बातमी! मंगळवेढा तालुक्यातील कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

धक्कादायक बातमी! मंगळवेढा तालुक्यातील कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण;


सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..  

मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथील कृषी भूषण असलेले तुकाराम उर्फ अंकुश राजाराम पडवळे यांना गाळ काढण्याच्या कारणावरुन पिस्तुल दाखवून जबर मारहाण केल्याची घटना

 दि.6 मार्च रोजी रात्री 8.30 च्या सुमारास जुनोनी ता.मंगळवेढा येथे घडली आहे.

याप्रकरणी 1) आकाश किसन इटकर, सध्या पंढरपुर 2) अंकुश शिवाजी इटकर, 3) रवि शिवाजी इटकर 4) करण शंकर इटकर (सर्व रा.लक्ष्मीदहिवडी ता.मंगळवेढा)

 5) अतुल किसन इटकर 6) सुमित जाधव (दोघे रा.पंढरपुर) व इतर 2 ते 3 इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, काल दि.6 मार्च रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी 

अंकुश पडवळे व त्यांचा पुतण्या संग्राम सिताराम पडवळे व भाऊ किसन राजाराम पडवळे असे जुनोनी तलावातील गाळ (माती) काढुन

फिर्यादीच्या शेतामध्ये घालण्याकरीता घेवुन जात असताना आकाश किसन इटकर, अंकुश शिवाजी इटकर, 

रवि शिवाजी इटकर, करण शंकर इटकर, अतुल किसन इटकर, सुमित जाधव व इतर 2 ते 3 लोकांनी आमचे जवळील दोन्ही ट्रॅक्टरच्या व जेसीबी च्या चाव्या काढुन घेवुन येथील गाळ काढायचा नाही

 या करणावरुन हातात तलवारी घेवुन गैरकायद्याची मंडळी जमवुन आकाश किसन इटकर याने फिर्यादी अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवुन जिवच मारतो अशी धमकी दिली आहे.

व वरील सर्व लोकांनी लाकडी काठ्याने, हाताने लाथाबुक्यांनी मारुन शिवीगाळी दमदाटी केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी वरील आरोपी विरुद्ध भादवी कलम 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 भारतीय हत्यार का कलम 3,4,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments