सांगोल्याला लागलेल्या गुन्हेगारीच्या ग्रहणाला पोलीस प्रशासन आळा बसवणार का?
एका पाठोपाठ एक असे घडत असलेल्या गुन्हेगारिच्या घटनेवरून कायद्याचा धाक कमी झाला आहे का ?
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२):
सांगोला शहर व तालुक्यात वाढती गुन्हेगारी गावपातळीवर व तालुकापातळीवरही गट-तट यामध्ये होणारे वाद विवाद, कमी श्रम आणि जास्त पैसा मिळवण्याच्या नादात गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकत असलेली तरुणाई यामधून अवैद्य व्यवसायामुळे वाढलेली
भाईगिरी तसेच सध्या शाळा कॉलेज स्तरावरील वाढती भायगिरी यासह एका पाठोपाठ घडत असलेल्या गुन्हे आणि गुन्हेगारीच्या घटनेवरून कायद्याचा धाक कमी झाला आहे का?,
समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन कमी पडतेय का? याचे आत्मपरिक्षण करणे गरजेचे असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरीकांतून होत आहे.
सामाजिक एकोपा शांतता, कायदा व सुव्यवस्था टिकून असणारा तालुका म्हणून सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्याची ओळख आहे. सांगोला शहर आणि तालुक्यात वेगवेगळ्या सण उत्सवानिमित्त घेण्यात येत असलेल्या शांतता कमिटीच्या बैठकांमध्ये
अनेकांनी सांगोल्याच्या शांततेबद्दल मोठमोठ्या वल्गना केल्या असल्या तरी आज ती शांतता सांगोल्यामध्ये दिसून येत नसल्याची चर्चा देखील व्यासपीठावर बोलणारे कमिटीचे मेंबरच बोलू लागले आहेत.
मागील अनेक वर्षापासून तालुक्यातील जनतेने शांतता व सुव्यवस्था जपली आहे. एकोपा टिकवून ठेवला आहे. मात्र मागील काही काळापासुन ठिक-ठिकाणी गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत.
महूद येथे झालेल्या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झाला ही घटना तालुक्यात पसरली यामुळे एक ना अनेक चर्चा सुरू असतानाच पाचेगाव मध्ये वृद्ध पती- पत्नीचा खून झाल्याची घटना घडली.
या एकापाठोपाठ एक अशा घटनांमुळे सांगोला तालुका चांगलाच हादरून गेला आहे. यामुळे शांततामय तालुका म्हणून नव्हे तर गुन्हेगारीमय तालुका होत
असल्याबाबत चर्चा सुरूझाली. गुन्हेगारी प्रवृत्ती नेमकी कोणत्या कारणामुळे सुरू झाली याचा आत्मपरीक्षण करण्याची वेळ या निमित्ताने प्रशासनावरच नव्हे तर आज आपल्या सर्वांवर येऊन ठेपली आहे.
वाद-विवाद, गट तटामध्ये होणारी हाणामारी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न यावर पोलिसांच्या कारवाईमधून अनेक तरुणांचे भविष्य उध्दवस्त झाले आहे.
तरी देखील सांगोला शहर व तालुक्यात वाढती गुन्हेगारी गावपातळीवर व तालुका पातळीवरही गट-तट यामध्ये होणारे वाद विवाद तसेच सध्या शाळा कॉलेज स्तरावरील वाढती भायगिरी व यामध्ये असंबंधीत तरुणांचा समावेश या सर्व गोष्टीला पाठीशी घालणारा
व अश्रय देणारा पालकवर्ग, समाज, स्वतःला लीडर मानणारे तरुण व नागरिक जबाबदार आहेत का ? याचे आत्मपरिक्षण करणे आज काळाची गरज बनली आहे. पोलिस प्रशासनाने देखील मोकाट सुटलेल्या
गुन्हेगार व गुन्हेगार वृत्तीच्या लोकांकडे गंभीर गुन्हा घडण्या अगोदरच वचक ठेवून जनतेचा विश्वास संपादन करायला हवा, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांच्याकडून व्यक्त होत आहे.
समाजामध्ये जनतेशी पोलिसांचा सुसंवाद आणि कायद्याचा धाक असणे
हे तितकेच महत्वाचे आहे. परतुं आज तालुक्याची परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी आपल्या खाक्या दाखविण्यास सुरुवात करावी अशीही चर्चा आहे.सांगोला शहर आणि तालुक्यात गल्ली, ग्रुप,
गाव व वाड्यावस्त्यावरच नव्हे तर शाळा व कॉलेज स्तरावर गट तट वाढत आहेत. गटाच्या माध्यमातून तेढ निर्माण होत आहेत. आज छोट्या-छोट्या घडणाऱ्या घटनांना वेळीच पायबंद घातले
नसल्यामुळे त्या कालांतराने म्हणजे आज मोठ्या बनू पाहत आहेत. परिणामी तालुक्यात गुन्हेगारीच्या क्रमात दिवसेदिवस वाढच होऊ लागली आहे.
सध्या शाळा, कॉलेज सुटण्यापुर्वी शाळा समोर व परिसरात रोमिओचा वावर, बस स्थानक परिसरात दुचाकीस्वारांची ट्राईल, शिकवणी ( क्लास ) सुटण्याची वेळ
हुल्लडबाजी करण्यासाठी उभारत असलेले तरुणांचे टोळके हे तालुक्याच्या शांततेला घातक ठरत आहेत.
या रोमिओ व हुल्लडबाजांना नेमका कुणाचा आशिर्वाद आहे. तसेच गुन्हेगारिला म्होरक्यांकडून खत पाणी घालण्याचा प्रकार घडत आहे का ? यामुळे तर तालुक्याच्या शांततेचा भंग होत नाही ना ?
असा प्रश्न उपस्थित होत आहे. फक्त सर्वसामान्य नागरीकांना नव्हे तर कायद्याच्या रक्षकाला देखील या गावगुंडाच्या दहशतीचा सामना करावा लागत आहे. तरी देखील प्रशासन गप्प का ? असा सवालही जनतेतून होत आहे.
तालुका भयमुक्त आणि सुरक्षीत बनवायचा असेल तर पोलिसांनी जनतेशी जवळीक सुंवसादाबरोबर कायद्याचा धाक दाखविणेदेखील आजच्या घडीला गरजेचे आहे. वाढती गुन्हेगारी आणि समाजातील शांतता व गावातील गावगुंडाना व शाळा कॉलेज वरील भायगिरिला चपराक बसविणे हे पोलिसांसमोर आवाहन बनले आहे.
तालुक्याला लागण होत असलेल्या गुन्हेगारीच्या ग्रहनाला पोलिस प्रशासन आळा बसविणार का ? यामध्ये पोलिस प्रशासनाला यश मिळणार का ? अशीही चर्चा तालुकावासियांतून होत आहे.


0 Comments